Breaking News

**जिंतूर-सेलू विधानसभा निवडणुकीच्य अटीतटीच्या सामन्यात भा ज पा च्या बोर्डीकर मेघना साकोरे हे 3719 मतांनी विजयी” **किरकेट च्या 20/20 सामने प्रमाणे निवडणुकीचा सामना”

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

          संपादक :-अकबर सिद्दिकी

जिंतूर-जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघात हाडांचेवैरी समजले जाणारे भांबळे- बोर्डीकर या दोघांची प्रतिष्ठा पन्हा ला लागल्याने या निवडणूकी कळे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते परंतु या निवडणूकित किरकेट च्या 20/20 सामान्या प्रमाणे निवडणूकी चा निकाल हि शेवटी लागला आणि या सामन्यात बोर्डीकर मेघना दिपक साकोरे हे निडून येऊन जिंतूर – सेलू विधानसभा ची प्रथम महिला आमदार झाल्याचा मान त्याना मिळा असून त्यानी राष्ट्रवादी चे उमेदवार विजय माणिकराव भांबळे यांना 3719 मताने पराभूत केल्याने या मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ फुल्ले
जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघात 2019 निवडणुकीचे पडघम वाचतात इच्छुक उमेदवारांसह दिग्गज नेतेमंडळींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून निवडणूक प्रचारात चांगली रंगत आणली होती जिंतूर विधानसभेसाठी एकूण 13 उमेदवार मतदारसंघात आपले भवितव्य आजमावण्याकरिता निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राम पाटील यांनी स्वतंत्र उमेदवारी दाखल केल्याने व वंचितकडून इच्छूक असलेल्या मनोहर वाकले यांनी मोठा आटापिटा करून वंचितची उमेदवारी आणल्याने मतदारसंघात चौरंगी लढत होईल असे वाटत होते. मात्र गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणीच्या आकडेवारीवरून महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर व महा आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्यात एकूण 30 फेऱ्यांमधील पहिल्या फेरीपासून ते 30 व्या फेरीपर्यंत अटीतटीची लढत पहावयास मिळाली. पहिल्या 7 व्या फेरीपर्यंत मेघना बोर्डीकर यांना कमीअधिक प्रमाणात आघाडी होती तर 8 व्या फेरीपासून ते 18 व्या फेरीपर्यंत विजय भांबळे यांचे आकडेवारीवर वर्चस्व होते. मात्र सेलू तालुक्याची सिमा लागताच मेघना बोर्डीकर यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेऊन विजय खेचून आणला 1 लाख 16 हजार 146 मते पडल्याने त्यांना 3 हजार 719 चे मताधिक्य मिळाले परिणामी जिंतूर तालुक्याच्या राजकीय इतिहासात पहिली महिला आमदार म्हणून मेघना बोर्डीकर यांनी ख्याती प्राप्त केली आहे. तर 1 लाख 12 हजार 579 मते घेऊन राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांना द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्या बरोबरच वंचितचे उमेदवार मनोहर वाकळे यांना 13 हजार 107 मते मिळाल्याने ते तिसऱ्या व राम पाटील यांना 4 हजार 717 मते मिळाल्याने ते चौथ्या क्रमांकावर राहिले. निवडणूक निर्णयाधिकारी उमाकांत पारधी यांनी 30 व्या फेरीनंतर निकाल जाहीर करताच विजयी महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या कार्यकर्त्यांसह समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर व माजी आमदार बोर्डीकर यांच्या निवासस्थाबाहेर विजयी जल्लोष केला. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मीरवणूक कडण्यात आली नाही

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close