जिंतूरात पत्रकार संघातर्फे समाजप्रबोधनपर व्याख्यान *डॉ अविनाश पाटील व शहाजी भोसले यांची उपस्थिती

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर—- येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार संघातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार 16 जानेवारी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता शहरातील जुनी मुन्सफी भाजी मंडई येथे अंधश्रद्धा देशाच्या विकासासाठी अडथळा या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर अविनाश पाटील यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान होणार असून याच कार्यक्रमात आधुनिक युगातील फसवणूक व वास्तव याबाबत चमत्कारी प्रात्यक्षिके शहाजी भोसले हे सादर करणार आहेत.
दरवर्षी पत्रकार संघातर्फे शहरात विविध सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येते गत वर्षी हास्यसम्राट अजित कोष्टी यांना आमंत्रित कऱण्यात आले होते. याही वर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून अंधश्रद्धा देशाच्या विकासासाठी अडथळा या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर अविनाश पाटील यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान आणि आधुनिक युगातील चमत्कार फसवणूक व वास्तव याबाबत चमत्कारी प्रात्यक्षिके देऊन शहाजी भोसले हे चमत्कारामागील वास्तव जनतेसमोर मांडणार आहेत. पत्रकार संघाच्या या समाज प्रबोधन कार्यक्रमास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष गजानन चौधरी कार्याध्यक्ष शेहजाद खान पठाण व सचिव वाकोडे यांनी केले आहे.
पुरस्कार होणार वितरण
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणाऱ्या पत्रकाराच्या लेखणीला सन्मानित करण्यासाठी जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक शोध पत्रिका सामाजिक व विकास वार्ता आदी मध्ये दर्जेदार पत्रकारितेत लिखाण करणाऱ्या कैलास चव्हाण सुधीर बोर्डे या पत्रकारांना 16 जानेवारी रोजी जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमात जिल्हास्तरीय पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.