Breaking News

*बालक मंदिर शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन* जिंतूर:-दि 27

संपादक  :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- येथील मंदिर पूर्व माध्यमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विज्ञान, चित्रकला व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉक्टर सुभाषचंद्र राठी,तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक ब्रिजगोपालजी तोष्णीवाल, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर,शहजाद पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, प्रा. अशोक वैद्य,परीक्षक सतीश इप्पर, राऊत उपस्थित होते.
बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व त्यांच्या मनात कलेची बीजं रुजविण्यासाठी या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर मांत्रिकाने राख व पाणी टाकून आग्निकुंड पेटवला.परंतु ही क्रिया अंधश्रद्धेवर आधारित असून त्याचे वैज्ञानिक कारण मात्र वेगळी असल्याचे यावेळी प्रयोगातून श्री मदन मोरे यांनी दाखवून दिले. विज्ञानाच्या युगात माणसाने अंधश्रद्धांच्या आहारी न जाता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून सत्यता तपासून पहावी असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांनी व्यक्त केले. या विज्ञान प्रयोगात शाळेतील 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग सादर केले. विज्ञान प्रदर्शनाला श्रीमती शकुंतला बाई बोर्डीकर प्राथमिक विद्यालय, डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव कुदळे गजानन तिखे, मदन मोरे, प्रसाद घुगे ,परसराम घंदारे, पद्मा जाधव, विजया पतंगे,अनिता मनोरवार, संजय साबळे, वसंत राठोड, प्रकाश खोलगडे,सुभाष चोपडे,सुभाष धानोरकर, गणेश रुघे आदी शिक्षकांनी प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close