Breaking News

प्राचीन युद्ध कलेच्या चित्तथरारक प्रात्येक्षिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली”” संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर प्रतिनीधी
शहरातील संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवप्रेमी नागरिकांसाठी चित्तथरारक प्राचीन युद्ध कलेच्या ऐतिहासिक खेळाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी शिवप्रेमी नागरिकांचा डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडले.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभर 19 फेब्रुवारी रोजी जगभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते त्याचेच औचित्य साधून शहरातील संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास विधिवत दुग्धाभिषक घालून पूजन करण्यात आले पुतळ्याचा चबुतरा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता तसेच पोवाडे व शिव गीतांचा आवाजामुळे पुतळा परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.यावेळी संध्याकाळी 7 वाजता कोल्हापूर येथील हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाडा असलेल्या कलाकारांनी तलवारबाजी,दांडपट्टा,लाठीकाठी आदींचे प्रात्याक्षिके सादर केली यामध्ये लाठीकाठी ने हल्ला परतवीने,गळ्यावर कची केळी कापणे,लिंबू कापणे इत्यादी चित्तथरारक प्रत्येक्षिक सादर केली यावेळी काळजाचा ठोका चुकवणारे प्रात्यक्षिक पाहुन प्रेक्षकांच्या अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडले यावेळी शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. याजयंती कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयन्त केले यावेळी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता..

शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या उपक्रमात सहभागी होऊन 23 फेब्रुवारी पर्यंत आपल्या घरीच शिवजयंतीची आकर्षक सजावट करून साजरी केल्याचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाला आकर्षक परितोष देण्यात येणार आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close