Breaking News

*सर्वच पत्रकारांना अधिस्वीकृती द्यावी* *जिंतूरच्या तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर – राज्यशासनाने पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका द्यावी, अशी मागणी जिंतूर येथील तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे तहसीलदार मार्फत सोमवार दि २४ फेब्रुवारी रोजी केली आहे.
जिंतूर येथील पत्रकार भवन येथे सोमवार दि २४ फेब्रुवारी रोजी पाथरी येथील दिवंगत पत्रकार कै माणिकराव केंद्रे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी झालेल्या बैठकीत शासनस्तरावर पत्रकारांना मदत करण्यासाठी असलेल्या असमाधानकारक योजनांबाबत पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना खंत व्यक्त केली.
राज्य शासनाकडून पत्रकारांना मदत करण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीने शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी ही योजना चालवली जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. परंतु ही पत्रिका देताना शासनाने मोठ्या जाचक अटी लादल्याने राज्यातील पाच टक्के पत्रकारांचा देखील या योजनेत समावेश होत नाही. त्यामुळे पत्रकार संघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना तहसील कार्यालय मार्फत यासंदर्भात निवेदन देण्यात आले
या निवेदनात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वच पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देऊन योजनेचे लाभार्थी करावेत, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी, कार्याध्यक्ष शहजाद पठाण, सचिव गुणीरत्न वाकोडे, एम ए माजिद, शेख शकील अहमद, नेमिनाथ जैन, विनोद पाचपिल्ले, शेख अलीम, शेख वाजीद, सिराज सिद्दिकी, रामप्रसाद कंठाळे, एम एजाज यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

*तालुक्यातील पत्रकारांनी मदतीसाठी*
*पुढे यावे -गजानन चौधरी*
दिवंगत सहकारी पत्रकार कै माणिकराव केंद्रे यांचे दुःखद निधन झाले तर त्यांच्या सौभाग्यवतींवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. अशा कठीण प्रसंगात केंद्रे कुटुंबास तालुक्यातील प्रत्येक पत्रकाराने मदत करावी. जिंतूर शहर व परिसरातील पत्रकारांनी शहजाद पठाण, बोरी परिसरात तुकाराम सर्जे, चारठाणा परिसरात आबेद देशमुख यांच्याकडे दोन दिवसात मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन जिंतूरच्या मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close