Breaking News

*लायन्स क्लब गंगाखेड तर्फे महिलांचा सन्मान*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

*गंगाखेड (प्रतिनिधी)*
दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लायन्स क्लब गंगाखेड टाऊन च्यावतीने शहरातील नवा मोंढा परिसरात विविध क्षेत्रातील महिला तथा गृहीणीचा सन्मान केला. याप्रसंगी लायन्स क्लबच्या वतीने डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शिक्षक, व्यापारी अशा विविध क्षेत्रातील महिलांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन नारी शक्तीचा सन्मान केला. तसेच नवदुर्गा महिला मंडळ यांच्यावतीने सुद्धा एक अभिनव उपक्रम राबवत जवळपास 40 सुनांनी आपल्या सासूच्या प्रती आदर व्यक्त करत महिलादिनाच्या निमित्ताने त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन आपापल्या सासूचा यथोचित सन्मान केला. या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब गंगाखेड टाऊन चे अध्यक्ष रामेश्वर तापडिया, माहेश्वरी सभा परभणी चे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री, सचिव बालाजी कांदे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम भंडारी, लायन्स सदस्य अशोक कवठेकर, प्रा. राजीव आहेरकर, जगदीश तोतला, ज्ञानेश्वर कापसे ॲड. राजू देशमुख,विशाल सुराणा,रामविलास तापडिया,गोपाळ तापडिया आदि लायन सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन ॲड. स्मिता देशमुख यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सपना लांडगे, रज्जुताई मंगलगे,रुपाली रुद्रवार ,छाया चक्रवार, मीरा तापडिया, भाग्यश्री गादिया, मीना धुळे, शिवकन्या खाकरे, अनुजा कोटलवार, पुनम तापडिया,भावना भंडारी, नभा महाजन,सोनाली होनराव,ज्योती धुळे, सपना नळदकर,सुनिता तापडिया, श्रद्धा बोरफळे, स्वप्ना कोद्रीकर व समस्त नवदुर्गा महिला मंडळ नवा मोंढा यांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close