बसस्थानक संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे घातले साकडे बसस्थानक उभारण्याचा मार्ग होणार मोकळा ?

संपादक :- अकबर सिद्दीकी
पालम मारोती नाईकवाडे
तालुका निर्मिती होऊन ही याठिकाणी प्रवाशांना ये -जा करण्यासाठी बसस्थानक नसल्याने बसस्थानक निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना साकडे घातले आहे, यामुळे याठिकाणी बस्थानक उभारण्याचा मार्ग मोकळा होतो की ? हेच पहावे लागणार आहे
तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक असणे हे गरजेचे असतानासुद्धा याठिकाणी निर्मितीलाअनेक वर्षाचा कालखंड लोटूनही तालुक्यातील ग्रामीण भागात येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना थांबण्यासाठी कसल्याच प्रकारची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना प्रमुख महामार्गावरील एका झाडाच्या आसऱ्याला उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते,पावसाळ्यात ये जा करणाऱ्या प्रवाशांची बसस्थानक अभावी मोठ्याप्रमाणात तारांबळ उडाली आहे हा तालुका असल्याने याठिकाणी अधिक प्रमाणात प्रवाशांसह वाहनांची संख्या अधिक प्रमाणात आहे हा मार्ग नांदेड पुणे औरंगाबाद नाशिक मुंबई यासारख्या शहराला जोडल्याने जातो तालुका निर्मिती झाल्यानंतर या ठिकाणी बस स्थानक होइल असे वाटले होते परंतु तालुका निर्मितीला पंचवीस वर्षाचा कालखंड उलटूनही याठिकाणी बसस्थानकाचा प्रश्न जैसे थे असल्याने शहरातील काही युवकांनी एकत्र येऊन बस्थानक संघर्ष समितीच्या माध्यमातून बसस्थानक उभारण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने निवेदने देण्यात आली असून त्याचाच भाग म्हणून संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग रोकडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मुगळीकर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर विशाल रोकडे भैय्या शिरस्कर विलास जोंधळे अविनाश हनवते धीच्या स्वाक्षर्या आहेत