Breaking News

दत्तकृपा भोजनालय शिव भोजन योजनेची सोनपेठ येथे सुरुवात .

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
सोनपेठ दि.२(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी शिवभोजन थाळी या बहुप्रतिक्षीत योजनेची सोनपेठ शहरात सुरुवात करण्यात आली.
कोणताही गरीब व्यक्ती राज्यात उपाशी राहु नये यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दहा रुपयात शिवभोजन थाळी या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. सुरवातीला ही योजना महानगरात व जिल्ह्याच्या ठिकाणी राबवण्यात येत होती .राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. या लाँकडाऊन मुळे हजारो नागरीक ठिकठिकाणी अडकुन पडले आहेत.या नागरीकांना स्वस्तात जेवण मिळावे म्हणुन तालुका पातळीवर शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या शिवभोजन केंद्रावर सध्या एका व्यक्तीस पाच रुपयात दोन पोळ्या,एक वाटी वरण,एक वाटी भाजी व एक वाटी भात मिळणार आहे .
सोनपेठ शहरातील नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील बालाजी भोजनालय येथे हे केंद्र सुरु करण्यात आले आहे.
दि २ रोजी या केंद्राचे उद्घाटन पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे ,नायब तहसीलदार साहेबराव घोडके यांच्या हस्ते करण्यात आले .या वेळी सुधीर बिंदू,पत्रकार रविंद्र देशमुख, राध्येशाम वर्मा,मंजुर मुल्ला,उमाकांत मेहत्रे नगर परिषदेचे पंडीत कदम ,मंडळ अधिकार वाणी,तलाठी परमानंद जमशेटे यांच्या सह पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या योजनेसाठी केंद्राचे बालाजी बागडे ,ज्ञानेश्वर बहादुर यांनी परीश्रम घेतले
या वेळेस शहरातील गरजु व्यक्तीनीं या थाळीचा अस्वाद घेतला .तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमू नये म्हणुन शहरात अडकुन पडलेल्या नागरीकांना त्याच्या वस्तीच्या ठिकाणी तर ग्रामीण रुग्णालयात विलगीकरण कक्षात तपासणी साठी आणलेल्या रुग्णांना हे शिवभोजन देण्यात आले.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close