“नगर परिषद जिंतूर मार्फत आ.विजय भांबळे यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १० हजार सेनीटायजर व ३० हजार मास्कचे वाटप सुरु.अत्यावाश्यक गरजेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये – माजी आ.विजय भांबळे

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर ;- ०९ एप्रिल, जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून संपूर्ण जगात कोरोनाची झपाट्याने वाढ होत आहे. व संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे, शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सामाजिक भान ठेवून नगर परिषद जिंतूर यांच्या तर्फे माजी आ.श्री विजय भांबळे, पोलीस निरीक्षक श्री अशोकजी घोरबांड यांच्या प्रमुख उपस्थितीत सेनिटायझर व मास्क चे वाटप सुरु करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले असून, कोरोनापासून दूर राहण्यासाठी स्वतः घरात बंदिस्त राहणे, हात वेळोवेळी सेनीटायझरने धुणे, नाक-तोंडावर मास्क लावणे, सोसिअल डीस्टस पाळणे अशी खबरदारी म्हणून उपाय करण्यास सांगितले आहे. त्यात अनेक कुटुंबाना मास्क, सेनीटायझरचा तुटवडा होऊ नये म्हणून नगर परिषद जिंतूर यांनी संपूर्ण शहरातील १० हजार राहत्या कुटुंबाना ३ मास्क व १०० मिली चे सेनीटायझर असे एकूण ३० हजार मास्क व १० हजार सेनीटायझरचे मोफत वाटप सुरु केले आहे. यावेळी प्राथमिक स्वरुपात प्रभाग क्र.५ मध्ये येलदरी रोड जिंतूर येथील बजरंग साबू यांच्या घरापासून सोसिअल डीस्टस सांभाळत सुरवात करण्यात आली.
यावेळी वाटप करताना प्रत्येक नागरिकांनी वारंवार आपले हात सेनीटायझर ने धूत राहणे, सोसिअल डीस्टस पाळणे व अत्यावश्यक गरजेव्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन माजी आ.विजय भांबळे यांनी केले.
यावेळी माजी आ.श्री विजय भांबळे, पोलीस निरीक्षक अशोकजी घोरबांड, कपिल फारुकी, मुख्याधिकारी जयवंत सोनवने, नगरसेवक श्यामराव मते, दलमीर पठाण, शहर अध्यक्ष शौकत लाला, स्वच्छता निरीक्षक शालेय चाऊस, नगराळ इंडिया प्रा.ली.चे ईश्वर साबळे, यांच्यासह शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.