पोलीस दला च्या पथसंचलन च जिंतूरात पुष्पवृष्टी व जलपानाने स्वागत जिंतूर ता व्यापारी महासंघाचा उपक्रम

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूर तालुका व्यापारी महासंघा कडून पोलीस दला च्या पथसंचलन वर मुख्य बाजारपेठ असलेल्या भागात पुष्पवृष्टी व जलपान करून जोरदार स्वागत करण्यात आलं
सद्या कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य रोगाची साथ जिंतूरात लागण होऊ नये म्हणून दिवस रात्र पोलीस दल जनतेच्या रक्षणार्थ कार्यरत आहे
आज दिनांक 9 एप्रिल रोजी जिंतूर शहरात परभणी पोलीस दला तिल अतिशीग्र दल दंगा पथक यांचं पथसंचलन आयोजित करण्यात आलं होतं शहरातील प्रमुख मार्गावरून हे संचलन काढण्यात आले पोलीस दलात मनोबल वाढण्या साठी हे संचलन चौवकात आले असताना व्यापारी महासंघाने आयोजन केल्या प्रमाणे पुष्पवृष्टी करण्यात आली
या वेळी जिंतूर चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक
श्री अशोक घोरबांड यांचं पुष्पहार घालून संजय कोकडवार यांनी स्वागत केलं तर सर्व पोलीस दल यांना थंड जल पाण देऊन स्वागत करण्यात आलं या मुळे सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी धन्यवाद व्यक्त केले या उपक्रमात सुनील तोष्णीवाल प्रदिप कोकडवार गणेश कुरे बद्रीनारायन पोरवाल दिलीप चिद्रवार भायेकर भाकरे मामा बिपीन चिद्रवार गिरीष वट्टमवार,गजानन कोकडवार कृष्णा कोकडवार आदी व्यापारी बांधवांनी सहभाग नोंदवला