Breaking News

चारठाणा पोलिसांची घावठी दारू भट्टीवर धाड एका विरुद्ध गुन्हा दाखल 30250 रुपये माल जप्त

   संपादक :-अकबर सिद्दीकी

जिंतूर :- चारठाना येथील पोलीस हद्दीतील मौजे सोनापुर (सोस तांडा) येथे दिनांक 14 एप्रिल रोजी एका घरावर पोलिसांनी धाड मारुन एका घरामधून 700 रुपये किमतीची हातभट्टी दारू व सहाशे पाच लिटर दारू तयार करण्याचे रसायन किंमत एकूण 30950 रुपयाची दारू जप्त. करून एका विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे
कोरोना आजाराचा आळा बसावा म्हणून भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे .
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडली तर राज्यातील सर्वच मार्केट बंद आहे.म्हणूनच या काळात अवेध्य मार्गाने गावठी बनावटीची दारू निर्माते व विक्रेत्याची पोळीच पीकल्याचे पाहावयास मिळत आहे.असाच एक प्रकार घडला आहे जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत
चारठाणा पोलिसांना या संबंदीत गोपनीय माहिती मिळताच मौजे सोनापुर (सोस तांडा)येथील राजेश उत्तम राठोड यांच्या घरावर छापा मारला आसता त्याच्या घारात दारू तयार करण्याचे सडके रसायनाणे भरलेले 4प्लॅस्टीकचे मोठे बॅरल स्टीलची टाकी स्टीलचे भांडे तसेच हातभट्टी दारुने भरलेली एक मोठी कॅन आढळून आल्याने संबधीत अरोपीवर चारठाणा पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याची फिर्याद पोलीस नाईक बूकरे यांनी दिली आसूण पुढील तपास बीट जमादार इरफान इनामदार हॆ करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close