Breaking News

जिंतूर- सेलू मतदारसंघातील लॉकडॉन मध्ये अडचणीत सापडलेले नागरिकांना मदद कार्यचे हात सुरूच,, आ.मेघना बोर्डीकर,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

      जनसमर्थक विशेष मुलाखत

जिंतूर :- जिंतूर-सेलू चे आमदार मेघना बोर्डीकर(साकोरे) यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडॉन मध्ये अडचणीत सापडलेले नागरिकांच्या गेल्या तीन आठवढ्या पासून मदद कार्य हात सुरूच ठेवले असून अनेक कुटुंबा पर्यंत हा मदतीचा ओग सुरूच असून अश्या नागरिकांतून आता समाधान हि व्यक्त होत आहे
   आ.बोर्डीकर एक महिला आमदार असून सुद्धा इथेच न थांबता कोरोना आजाराची भीती मनात न बाळकता थेट रस्त्यावर उतरून हातात माईक घेऊन नागरिकांना कोरोना आजारा चा पादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी घेत शोशल डिस्टनसिंग चे धळे देऊन त्यांना जागरूक करून शिस्त लावली त्या दिवसा पासून जिंतूरकरांना सोईयुक्त सुविधा उपल्पब्ध झालंय असल्याने नागरिक समाधानी आहे
    आ.मेघना बोर्डीकर यांनी या भयावे आजारवरची गंमभिरता ओळखून जिंतूर- सेलूत येथील अधिकारी वर्गाच्या प्रत्यक्ष भेटी घेवून आढावा घेतलेला सर्वाना सोबत घेऊन कामाला सुरुवात केली व या नंतर लॉकडाऊन मध्ये गरजूंची अडचण होवू नये या साठी सेलू येथे कम्युनिटी किचन सुरू केले या मार्फत गरजे नुसार दररोज ६० ते १०० गरजेनुसार जेवनाचे डबे पुरवले जात आहेत. तर दोन्ही शहरातील जिंतुर व सेलु जवळपास ३०० कुटुंबांना धान्याची मदत करण्यात आली आहे.हि मदत सध्याही सुरूच आहे.
        लॉकडाऊन चा सर्वाधीक फटका जिंतूर – सेलू या दोन्ही तालुक्यातील स्थलांतरित कामगार वर्गाला बसला आहे.हे कामगार आहे त्याच ठिकाणी अडकलेले आहे त्यांना त्याच ठिकाणी धान्य पुरवठा, जेवणाचे पाकीट याची व्यवस्था करुन मोठया प्रमाणात मदत करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कड़गाव ( ता. नांदोलि ज़ि कोल्हापुर ), नागराळा ( ता. पलुस जि. सांगली ), बार्शी ( जि. सोलापुर ), रेहमानपुर, कोळसेवाडी, चिमणगाव ( ता. कोरेगाव जि. सातारा ), ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, नवी मुंबई, पनवेल, खारघर, घणसोली, बोईसर, पालघर आदि ठिकाणी विविध माध्यमांतून थेट मदत पोहोचवण्यात आली आहे.
आ. बोर्डीकर यांच्या वतीने सर्वात मोठी मदत पुणे शहर व जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना करण्यात आली आहे. त्यात पुणे येथील गोखले नगर, बालेवाडी, घोरपडी, बाणेर, नऱ्हे धायरी, सिंहगड रोड, लुल्ला नगर, बिबवेवाड़ी, रांजनगाव, वाघोली,शिक्रापुर, सणसवाडी, चंदनगर, शिरुर, पिरंगुट, भोसरी, चाकण, पेरने फोटा हडपसर येथील स्थलांतरीतांना राशन कीटचे वाटप करण्यात आले आहेत. तसेच औरंगाबाद व नाशिक येथे काही भागांत मदत पोहोचवण्यात आली आहे. विशेष म्हञजे राज्या बाहेर हैद्राबाद, तेलंगाना व सुरत, गुजरात येथील अडकलेल्या जिंतूर/ सेलू वासीय नागरिकांनाही मदत पोहोचवण्याचे कार्य युद्धपातळीवरून सुरू आहे.

           गरजूंना हि मदत करत असताना मी एकटी माझ्या दोन हातांनी सर्व काही करू शकत नाहीत म्हणून या मदत कर्यात यामध्ये काही ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था, भाजपाचे त्या त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी तसेच साकोरे आणि बोर्डीकर परिवाराचे असलेले मैत्रीचे संबंध व नाते संबंधांचे सहकार्य घवून ही मदत गरजूंना ऊपलब्ध करून दिली जात असल्याचे आ. मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. कितीही यंत्रणा लावली तरी सर्व गरजवंतांपर्यंत पोहोचणे लगेच शक्य होत नाही. मदतीचा हा महायज्ञ अखंड सुरूच राहणार आहे. काही कारणांमुळे ज्यांच्या पर्यंत मदत मदतीचा हात पोहोचण्यास उशीर होत आहे, अशांनी संयम ठेवावा व स्वतःची काळजी घ्यावी. शक्य तेवढ्या लवकर प्रत्येक गरवंतापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न सुरू असून अशा नागरिकांनी धीर सोडू नये, असे आवाहन आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे .

*बाळंतीणीस मिळाली वैद्यकीय मदत*
जिंतूर मतदार संघातील ऊसतोड कामगारांचा एक गट सांगलीहून आपल्या गावी निघाला होता. या प्रवासादरम्यान केज येथे आल्यानंतर एका महिलेस प्रसव वेदना सुरू झाल्या. ही माहिती कळताच आ. मेघना बोर्डीकर यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांमार्फत संबंधीत महिलेस वैद्यकीय मदत ऊपलब्ध करून दिली. बाळ बाळंतीण दोघेही आता सुखरूप असून ऊसतोड कामगार कुटुंबियांनी आ. बोर्डीकर यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close