Breaking News

धक्कादायक बात्मी पभणीला ला आढळला पहिला कोरोना बाधीत रुग्ण,एम.आय.डीसी.परिसर सील

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

       संपादक :- अकबर सिद्दीकी

परभणी :- लॉकडाऊन चा पहिला टप्पा  सुरळीत पार पाडल्यानंतर गुरुवारी (ता. १६ एप्रिल २०२०) कोरोना विषाणु बाधीत पहिला रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. पुण्याहून आलेल्या एका २१ वर्षीय युवकाला याची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. त्यामुळे इतके दिवस ग्रीन झोनमध्ये असलेला परभणी जिल्हा एकदमच ऑरेंज झोनमध्ये गेला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परभणी जिल्हायाने यश प्राप्त केले होते. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे परभणी जिल्हा सेफ झोनमध्ये होता. पंरतू अचानकच गुरुवारी एका २१ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. परिणामी, परभणी शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हा युवक पुणे येथून 11 एप्रिल 2020 रोजी परभणीला पायी आला होता. परभणीला आल्यानंतर तो शहरातील औद्योगिक परिसरातील एक काॅलनीत वास्तव्यास होता. त्याला कोरोनाची लक्षणे सर्दी, खोकल्याच्या तक्रारीमुळे त्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्याचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल गुरूवारी प्राप्त झाल्याबरोबर वैद्यकीय अधिका-यांनी त्या रुग्णांची स्वतंत्र अशी व्यवस्था केली असून त्यांच्यासह वैद्यकीय निगराणी ठेवून आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
या युकाकाचेआहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोना विषाणुने शिरकाव केल्याचे समोर आले आहे.

कुटुंबियांची तपासणी होणार
त्या २१ वर्षीय युवकाच्या कुटुंबियांची तपासणी होणार असल्याची माहिती हाती आली असून, यासंदर्भात आरोग्य विभागाने अधिक तपशील दिला नाही. त्या युवकाचे नाव, त्याचा पत्ता, भाग वगैरे बाबत गुतप्ता बाळगली जाणार आहे.

औद्योगिक परिसर सिल
जिल्हयात पहिला कोरोनाचा रुग्ण परभणी शहरातील औद्योगिक परिसरात आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खबरदारी घेतली जात आहे. ज्या औद्योगिक परिसरात हा रुग्ण आढळला आहे. तो संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close