Breaking News

परभणी परिसरात 17 ते 19 एप्रिल दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता कडक संचार बंदी लागू

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

      संपादक :- अकबर सिद्दीकी

परभणी ;- कोरोना पार्श्वभूमीवर परभणी शहरातील तीन किलोमीटर परिसरात 17 ते 19 दरम्यान अत्यावश्यक
सेवा वगळता संचार बंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिलारी द.म. मुगळीकरयांनी दिली आहे
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त इतर व्यक्ती व वाहनांना नियंत्रित करणे आवश्यक असल्याने
या संचारबंदीतुन सर्व शासकीय कार्यालये व कर्मचारी त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने, शासकीय निवारागृहे, कॅम्पमध्ये तसेच बेघर व गरजूना अन्न वाटप करणारे एनजीओ व त्याची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती, वैदयकीय आपात्काल व अत्यावश्यक सेवा, शासकीय दुध संकलन व त्यांची वाहने, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे संपादक, प्रतिनिधी, वार्ताहर व वितरक याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती, वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक, परभणी शहर महानगरपालिका आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग परभणी , अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त, तालुका दंडाधिकारी परभणी यांच्यावर राहील. असेही आदेशात नमूद केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close