*परभणीत कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा* – जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर

संपादक :- अकबर सिद्दीकी
परभणी दि.17:- कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करण्यासाठी परभणी शहरातील कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांनी घराच्या बाहेर न पडता जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच केवळ अत्यावश्यक वस्तू व सेवांसाठी परभणी शहर महानगरपालिकाअंतर्गत नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
परभणी शहरात बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या एका रुग्णास कोरोना विषाणू संसर्ग बाधा झाल्याचे निदान झाले असल्याचे दि. १६ एप्रिल रोजी कोविड – १९ तपासणीअंती समोर आले आहे. त्या अनुषंगाने कोविड – १९ या साथरोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने परभणी शहरातील दुर्गा नगर , कपिल नगर , वृंदावन कॉलनी , सहारा कॉलनी , प्रबुद्ध नगर , महात्मा फुले नगर , प्रियदर्शनी नगर , आहिल्याबाई होळकर नगर , राजे संभाजी नगर , संदरी नगर , श्रेयस नगर , जिजाऊ नगर , एम . आय . डी . सी . परिसर , कृषी सारथी कॉलनी , रामदास नगर , चथरा नगर , रचना नगर , सोमनाथ नगर , राजेंद्रगिरी नगर , अंबा भवानी नगर , मथुरा नगर , गोकुळ नगर , गजानन नगर , समाधान कॉलनी , साईबाबा नगर , ए – वन मार्केट , भाग्य नगर , वैभव नगर , गाडगे बाबा नगर इत्यादी परिसर कंटेंटमेंट झोनमध्ये समाविष्ठ करून हा परिसर नागरिकांसाठी प्रतिबंधित परिसर म्हणून घोषित केला आहे. तरी या परिसरातील एकूण ४ हजार ८६ घरातील नागरिकांनी कुठल्याही कारणास्तव घराबाहेर पडू नये.
महानगरपालिकाअंतर्गत नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप क्रमांक विठ्ठल सावणे वसुली लिपीक . ९४०५७६६६६४ , ९५८८६५०६५१, विठ्ठल शेळके वसुली लिपीक ९४२१७६४७७१, विठ्ठल गिराम वसुली लिपीक ९०४९२२३३६४, दिगंबर जाधव वसुली लिपीक ९३०९५५४२७६ , ९८२३९६१६९१, जुबेर हाश्मी वसुली लिपीक ९८९०६६४०५४, पांडुरंग रणेर वसुली लिपीक ७५८८०१८४१८ , सुनिल भराडे वसुली लिपीक ८३७९९५६३८७ याप्रमाणे असून अत्यावश्यक सेवेसाठी संपर्क करावा. असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.