Breaking News

पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर आवाहन *मुस्लिम बांधवांनी एकत्र न येता घरातच धार्मिक कार्य पार पाडावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे* -जिल्‍हाधिकारी श्री. मुगळीकर

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

           संपादक :- अकबर सिद्दीकी

परभणी दि.21:- मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजान महिना सूरु होत असून रमजान महिन्यात मुस्लिम समाजात मोठया संख्येने मस्जिदमध्ये जावून तसेच सार्वजनिकरीत्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. सद्यस्थिती विचारात घेता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने कोरोना (कोव्हीड- 19) विषाणूचा प्रसार रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तरी मुस्लिम समाज बांधवांनी लॉकडाऊनच्या काळात एकत्र न येता आपापल्या घरातच धार्मिक कार्य पार पाडावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ( COVID – 19 ) या विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य म्हणून घोषीत केला आहे . तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात , महाराष्ट्रातील शहरात गतीने प्रसारीत होत आहे . नुकताच परभणी शहरातही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजातील लोक नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येत असतात परंतु सद्यस्थिती विचारात घेता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग, संक्रमण मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामधून मोठया प्रमाणावर जिवित हानी होवू शकते. यामुळे सर्वांनी यासाठी सहकार्य केल्यास रोगाचा प्रसार रोखण्यास फार मोठी मदत होणार आहे. तरी सर्व मुस्लिम बांधवांनी या आवाहनास प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हयातील सर्व मुस्लिम धर्मीयांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सद्या सूरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यात देखील कटाक्षाने करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नियमीत नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येवू नये. घराच्या इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येवू नये तसेच मोकळया मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार करण्यात येवू नये.कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबीक कार्यक्रम एकत्रित येवून करण्यास मज्जाव करण्यात आला आहे याची नोंद घेण्यात यावी. तरी सर्व मुस्लिम बांधवानी त्यांच्या घरात नियमीत नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावेत. लॉकडाऊन विषयी पूढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. असेही जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close