Breaking News

जिंतूरात अत्यावश्यक सेवा वगळून दोन दिवस कडक संचारबंदी, तहसीलदार सुरेश शेजुळ,,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- माननीय जिल्हाधिकारी परभणी यांनी आज दिनांक 22 एप्रिल 2020 रोजी काढलेल्या आदेशानुसार आज रात्री बारा वाजल्यापासून 24 एप्रिल 2020 रोजी रात्री 12 पर्यंत नगर पालिका व लगतच्या तीन किलोमीटर क्षेत्रामध्ये पूर्णपणे संचारबंदी लागू राहणार आहे.

 या दोन दिवसात सर्व किराणामाल दुकान भाजीपाला व इतर अस्थापना पूर्णपणे बंद राहतील.

सर्व खाजगी दुचाकी ,तीनचाकी चार चाकी वाहने बंद राहतील.
ग्रामीण भागातून येणारे खाजगी वाहनांना *जिंतूर शहर व तीन किलोमीटर* भागात प्रवेश दिला जाणार नाही.

दूधवाले सकाळी नऊ वाजेपर्यंत घरोघरी जाऊन दूध विक्री करू शकतील.

शहरातील सर्व हॉस्पिटल्स व मेडिकल्स चालू राहतील तसेच अत्यावश्यक सुविधा जात पाणीपुरवठा वीज पुरवठा इत्यादींचा समावेश असेल अशा अत्यावश्यक सुविधा सुरू राहतील.

संचार बंदीतून सूट असणारे कर्मचारी व वाहने खालील प्रमाणे हॅलो

1)सर्व शासकीय कार्यालयाचे कर्मचारी व अत्यावश्यक सेवा कर्मचारी व त्यांना वापरली जाणारी वाहने
2)गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारी वाहन व त्यावरील कर्मचारी
3)पेट्रोल पंप वितरक कर्मचारी व त्यांची वाहने
4) प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांचे संपादक वार्ताहर प्रतिनिधी व वितरक
5) खत वाहतूक त्यांचे गोदामे दुकाने त्यांच्या साठी लागणारी वाहने व कामगार
6)सर्व शासकीय व खाजगी दवाखाने सर्व औषधे दुकाने वैद्यकीय कर्मचारी वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी

*अत्यंत महत्वाची सूचना*

नागरी भागात वरील सूट दिलेल्या व्यक्ती व वाहन व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती किंवा वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 नुसार संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close