Breaking News

किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे दरपत्रक लावणे बंधनकारक , नसता फौजदारीचा ईशारा, “उपजिल्हाधिकारी “पारधी”

   संपादक ;- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- किराणा व जीवनावश्यक वस्तू चे सामान जास्त दराने विकल्या जात असल्याचे अनेक तक्रारीन जिल्हाधिकारी कार्यलयाला प्राप्त होत असून या प्रकरणी उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी संबधित दुकान दारांनी आपल्या दुकानात वस्तूवर दरपत्रक लावणे बंधनकारक आहे नसता दंड व फौजदारीचे गुन्हे दाखल होतील असा इशारा देण्यात आला
जिंतूर व सेलू शहरातील सर्व व्यापारी बांधवांना कळविण्यात येते मा. जिल्हाधिकारी परभणी यांच्या आदेशानुसार किराणा आणि जीवनावश्यक वस्तूचे विक्रेत्यांनी आपल्या दुकानात दर अथवा वस्तूवर दर पत्रक लावणे बंधनकारक आहे. दर पत्रक न लावणे असे आढळल्यास 1000 हजार रुपये दंड करण्यात येईल.जर दुसरी वेळेस हा गुन्हा झाला तर फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. आपल्यावरील अप्रिय कारवाई टाळण्यासाठी आपल्या दुकानात किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचे दरपत्रक लावणे अनिवार्य आहे असे हि या वेळी सांगण्यात आले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close