Breaking News

वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापनांनी संगणकीय प्रणालीचा वापर करून माहिती सादर करावी* – जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर *दैनंदिन अहवाल भरणे बंधनकारक

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

    संपादक :- अकबर सिद्दीकी

परभणी दि.27 :- जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय सामुग्रीची तसेच दैनंदिन तपासणी झालेल्या रुग्णांची माहिती संकलित करण्यासाठी ‘हॉस्पिटल इन्फॉर्मेशन कलेक्शन सिस्टीम’ ही संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. तरी शहरातील सर्व वैदयकीय सेवा देणाऱ्या आस्थापना, सरकारी व खाजगी दवाखाने यांनी या प्रणालीचा वापर करून माहिती सादर करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
संगणकीय प्रणाली सोमवार दि. २७ एप्रिल २०२० पासून https://www.collectorpbn.in/hics/ या वेब अॅड्रेसवर कार्यान्वित करण्यात आली असून नोंदणी करतेवेळी आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा तसेच वैद्यकीय स्टाफ आदी माहिती भरावयाची आहे. हॉस्पिटलबाबत नोंदणी करतांना एकच मोबाईल नंबर प्रत्येक हॉस्पिटलने भरावा कारण हा मोबाईल नंबर म्हणजेच दैनंदीन माहिती भरण्यासाठीचा यूजर आयडी असणार आहे . यापुर्वी प्रसिद्ध केलेल्या गुगल फॉर्म मध्ये नोंदणी केलेल्या हॉस्पिटलने परत नोंदणी करावयाची आवश्यकता नाही. दैनंदीन माहिती मध्ये सर्व हॉस्पिटल मधील रिक्त बेडची संख्या तसेच तपासलेल्या रुग्णांची संख्या ही माहिती भरावयाची आहे. रोज रात्री 9 वाजेपर्यंत त्या दिवसाचा दैनंदिन अहवाल भरणे बंधनकारक आहे. असे आदेश जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी सर्व हॉस्पिटल्स प्राधिकरणांना दिले आहेत.
जिल्ह्यातील वैद्यकीय सामुग्रीची तसेच दैनंदीन तपासणी झालेल्या रुग्णांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांच्यामार्फत Hospital information collection System ( HICS ) ही संगणक प्रणाली तयार करण्यात आली असून प्रणालीची निर्मिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर यांच्या संघाने केली आहे. असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close