Breaking News

* मे महिन्याचे धान्य २७ एप्रिलपासून वाटपास सुरुवात. *राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्याना लाभ मिळणार* – जिल्हाधिकारी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

       संपादक :- अकबर सिद्दिकी

परभणी दि.28 :- जिल्ह्यातील तहसिल कार्यालय व संबंधित रास्तभाव दुकानदारांकडे असलेल्या डी- १ रजिस्टरवरील नोंदीनुसार पिवळी अथवा एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका असलेल्या परंतू राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांना या योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर यांनी दिली.
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत व एपीएल केशरी शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या , एपीएल ( केशरी ) शिधापत्रिकाधारकांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पुढील २ महिन्याच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने गहु ८ रुपये प्रतिकिलो व तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
परभणी जिल्हयाकरिता ७८ हजार ११९ एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका व त्यावरील 3 लाख 3६ हजार ७७१ लाभार्थी संख्यानुसार नियतन प्राप्त झाले असुन सदर लाभार्थ्याना मे २०२० या महिन्यात एकुण गहू १ हजार १० मे . टन व तांदुळ ६७४ मे . टन वाटप करण्यात येणार आहे .
तसेच या व्यतिरिक्त संगणक प्रणालीवरील NPH शिधापत्रिका, डिलीट झालेल्या शिधापत्रिकांना संबंधित शिधापत्रिकाधारकाकडे प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या पिवळया, एपीएल ( केशरी ) शिधापत्रिकांच्या आधारे त्या शिधापत्रिकाधारकास सदरील योजनेतील अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे. थोडक्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना , तसेच एपीएल शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्या सर्व पिवळया व एपीएल ( केशरी शिधापत्रिकाधारकास या योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे . तसेच सदरील योजनेचा लाभ घेताना संबंधित लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानदाराकडे उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यात कुटूंबाची माहिती उपलब्ध करुन देणे अनिवार्य राहिल.
सर्व शिधापत्रिकाधारकांना माहे मे मधील धान्य २७ एप्रिल 2020 रोजीपासून रास्त भाव दुकानदारांकडून वाटप सुरु झाले आहे. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत असलेल्या काही पात्र शिधापत्रिका Silent RC मध्ये वर्ग झालेल्या असतील अशा शिधापत्रिका अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहू नये म्हणून अशा शिधापत्रिकाधारकाने अन्नधान्याची मागणी रास्तभाव दुकानदाराकडे केल्यास त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन धान्य वितरीत करण्यात येणार असल्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती सूर्यवंशी यांनी सांगीतले. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close