Breaking News

*आर्य वैश्य समाज “आई” म्हणून सेवा बजावत आहे* -पो नि अशोक घोरबांड पोलीस दला ची लॉकडाऊन मध्ये नास्ता चहा पान ची जिंतूरात अविरत सेवा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :-  कोरोना संसर्ग परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी जिंतूर येथे जनतेच्या रक्षणा साठी
पोलीस दल लॉकडाऊन मध्ये चोवीस तास ड्युटीवर आहे अशा वेळी त्यांना नास्ता चहा उपलब्ध करून देऊन गेल्या 24 मार्च पासून जिंतूर शहरात “आर्य वैश्य समाजाचे बांधव आई ची भूमिका बजावत आहेत” असे भावपूर्ण उदगार जिंतूर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी काढले
या महत्वपुर्ण सेवा कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

महाभयंकर कोरोना रोगाचा संसर्ग पसरू नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊन आहे या काळात पोलीस अधिकारी कर्मचारी कडक उन्हातान्हात आपली ड्युटी बजावत आहेत त्या मुळे एक सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांची चहा पान व खाण्याची सुविधा कुठं होऊ शकत नाही म्हणून येथील श्री नगरेश्वर मंदिरात गेल्या 24 मार्च पासून आज पर्यंत दररोज सकाळी 9 ते 11 या वेळेत पौष्टीक कडधान्य नास्ता आणि तोही रोज वेगळा वेगळा करण्यात येतो या बरोबरच चहा पान करून ही सेवा आर्य वैश्य समाजा कडून केली जात आहे दानशूर व्यक्तीच्या मदतीने युवा कार्यकर्ते अशोक चिद्रवार सुनिल वट्टमवार गोविंद वट्टमवार कृष्णा चिद्रवार प्रवीण वट्टमवार यांच्या सह मंदिराचे व्यवस्थापक राम गुंडावार,पेशकर हे या उपक्रमात आपली सेवा बजावत आहेत या सुविधे मुळे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सा पो नि स्वामी यांच्या सह सर्व अधिकारी कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close