उदगीरात कोरोना योध्यांना होमीओपॅथिक औषधी वाटप

संपादक :-अकबर सिद्दीकी
उदगीर.11 मे.आज कोरोनाला हरविण्यासाठी योद्धे म्हणून भारतामधील संपूर्ण पोलिस विभाग कार्यरत आहे.त्यामुळे सर्वात जास्त धोका त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आहे केंद्रशासनाच्या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सामाजिक बांधिलकी म्हणून उदगीर येथील प्रसिद्ध होमीओपॅथिक डॉक्टर डॉ. संतोष कोटलवार यांनी आर्यवैश्य ऑफिशियल &प्रोफेशनल असोसिएशन(अव्होपा)या संघटनेच्या माध्यमातून उदगीर येथील ग्रामीण आणि शहरी अश्या एकूण 300 पोलीस ,अधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी(Immunity) होमीओपॅथिक औषधा ची 300 किट उदगीर चे DYSP मधुकर जवळकर
आणि उदगीर शहर पोलीस निरीक्षक श्री.महेश शर्मा यांना सुपूर्द केले यावेळी डॉ. संतोष कोटलवार,अव्होपा अध्यक्ष डॉ.दीपक चिद्दरवार,सचिव प्रा. सुनील वट्टमवार,कोषाध्यक्ष बालाजी बुन्नावार,सामाजिक कार्यकर्ते धनंजय गुडसुरकर उपस्थित होते.या बद्दल DYSP श्री.मधुकर जवळकर आणिश उदगीर शहर निरीक्षक श्री.महेश शर्मा यांनी पोलीस विभागाच्या आरोग्याची काळजी घेतल्याबद्दल डॉ.संतोष कोटलवार व अव्होपा चे आभार मानले.