Breaking News

*जिंतूरात पाणी प्रश्नाला मोठा दिलासा,, वीज निर्मिती बंद करून नागरिकांना शुद्ध पाणी द्या जिल्हाधिकारी यांचे आदेश,, *नगर पालिकेच्या पाठपुराव्याला आले यश,,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

         संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतूरात गेल्या महिन्याभरा पासून जिंतूर नगरपालिका कडून शहरात अनियमितपणे व पिवळ्या रंगाचे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांतून पालिकेच्या विरुद्ध प्रचंड रोष व्यक्त होत होता या वर नगराध्यक्ष यांच्या प्रयत्नांना यश आले असून दिनांक 19 मे रोजी परभणी जिल्हाधिकारी यांनी एलदरी धरणाची वीज निर्मिती बंद करून नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्यधिकारी यांना आदेश दिले असल्याने नागरिकांना पाणी प्रश्न बाबत मोठ दिलासा मिळाला
येलदरी धरणातुन निसर्ग होऊन हे पाणी नदी पात्रा मध्ये आल्यावर जिंतूर शहराचा पाणी पुरवठा अवलंबून आहे साध्या या धरणात पाणी मुबलक असल्याने येथे वीज निर्मिती सुरू करण्यात आली होती परंतु या वीज निर्मिती यंत्र मधून जे पाणी धरणाच्या बाहेर निसर्ग होतो तो पिवळ्या रंगाचा व दुषीत पाणी नदी पात्रात येतो व हे पाणी
नगरपालिका च्या जल शुद्धीकरण यंत्र कडून शुद्धीकरण करून सुद्धा पाणी शुद्ध होता नाही आणि याच कारणाने शहराला दुषीत पाणी पुरवठा होतो हि बाब नगर पालकाकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी एलदरी धरणाची वीज निर्मिती बंद करून शहराच्या पाणी पुरवठाया साठी नदीपात्रात शुद्ध पाणी सोडण्याची मागणी पालिकेने परभणी जिल्हाधिकारी यांचे कळे केली होती याचाच पाठपुरावा म्हणून नगराध्यक्ष कफिल फारुकी, नगर सेवक शाहेद बेेेग,मुख्यधीकारी जयंत सोनुने यांनी आज जिल्हाधिकारी यांची समक्ष भेट घेऊन पाणी पुरवठा बाबत जिंतूरातील नागरिकांच्या तिरव भावना त्यांच्या समोर मांडल्या अस्ता जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी तात्काळ धरणातील वीजनिर्मिती बंद करुन धरणाच्या नदी पात्रात शुद्ध पाणी सोडण्याचे आदेश नांदेड पाटबंधारे विभाग नांदेड यांना दिले आहे या मुळे आता नांगरिकाना लवकरच शुद्ध पाणी पुरवठा होईल असे नगर अध्यक्षच्या वतीने जनसमर्थक ला सांगण्यात आले असल्याने नागरिकांना पाणी प्रश्न बाबत मोठा दिलासा मिळणार आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close