Breaking News

जिंतूर तालुक्यत वन्यप्राण्यांचीच्या धडकने पती ठार तर पत्नी गंभीर जखमी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतुर तालुक्यतील जिंतूर- बामणी रस्त्यावर वझर कडे जात असलेले शेतकरी हे बामणी पासून जवळ असलेली करंजी पाटी जवळ दिनांक 28 मे रोजी रात्री 10 च्या मोटारसायकलने जात असताना अचानक रुई वन्यप्राणी मोटरसायकलच्या समाेर आल्याने या दोघांची धडक होऊन अपघात झाला या मुळे मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून परभणी येथे खासगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की जिंतूर शहरातून लक्ष्मण दशरत मानकरी वय ४९ वर्ष राहणार बझर व त्यांची पत्नी उषा लक्ष्मण मानकरी हे दाेघे रात्री दहाच्या सुमारास जिंतुर येथुन मुली ची भेट घेवुन गावी परत जात असतांना करंजी पाटी जवळ एम एच २० ऐ डब्ल्यू ८७०६ या माेटरसायकल व राेई वन्य प्राण्यांची अंधारात अचानक धडक झाली या अपघातात दोन्ही मोटारसायकल वरून खाली पडले व पती पत्नी गंभीर जखमी झाले याबाबत फोनवरून माहिती मिळताच नातेवाईक व गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली या दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालय जिंतुर येथे उपचारासाठी रात्री दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी यांनी तपासुन लक्ष्मण मानकरी यास मृत घोषित केले त्याची पत्नी गंभीर जखमी असल्याने परभणी येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले लक्ष्मण मानकरी यास एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या घटनेमुळे वझर गावात शाेकाकुळ पसरला आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close