Breaking News

जिंतूरात नागरिका साठी भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

     

     

            संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतूर सेलू चे आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांच्या व विविध्य समस्यांच्या निराकरणासाठी दि.04/06/20 रोजी बुधवारला भाजपाच्या वतीने दुपारी.12 ते 2 धरणे आंदोलन करण्यात आले.
१.सर्व शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी पूर्ण करून घेणे बाकी राहिलेल्या घरातील कापसाची पंचनामे करून पेरणीसाठी हमीभाव प्रमाणे मावेजा देण्यात यावा.
२.शेतकऱ्यांना पेरणीसाठी 15 जून पूर्वी पीक कर्ज मंजूर करून वाटप करावे.
३.शेतकऱ्यांना रास्त भावात बी बियाणे व खते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वाटप करण्यात यावे.
४.कोविड योद्धाना तात्काळ वेतन देण्यात यावे.तसेच कोविड योद्धे तथा कर्मचारी अतिसंविदनशील भागात सेवेसाठी व इतर कामासाठी कार्य करणार्यांना पूर्ण संरक्षण देण्यात यावे मास्क , गोल्ज व इतर साहित्याचे वाटप करण्यात यावे.
५. तालुक्यातील सहा गावांना राज्यपालांनी देऊ केलेले दुष्काळी अनुदान अद्यापही वाटप झालेले नाही तरी सदरील अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे.
६. बोगस बी बियाणे व खते विक्री झाल्यास संबंधीत कृषी अधिकाऱ्यांवर जवाबदारी निश्चित करून कारवाही करावी.
७. तालुक्यातील निराधाराना सरकारने तीन महिन्याचे मानधन देण्याचे जाहीर केलेले असतांना अद्याप वाटप झाले नाही ते वाटप करावे.
८. तालुक्यातील आशाताई व अंगणवाडीताई 5000 रु मानधन कोविड 19 संसर्ग धर्तीवर देण्यात यावे.
यावरील मागण्या संदर्भात भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळेस निवेदन देतांना
#भाजपा_तालुकाध्यक्ष _प्रताप_देशमुख
#डॉ_पंडित_दराडे #विलास_भंडारे #अँड_गोपाळ_रोकडे
#अ_रहेमान_अ_खुदुस #सुमेध_सूर्यवंशी #रोहित_देशपांडे
मुखिद भाई , प्रवीण प्रधान इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close