जिंतूरात कोरोना योद्धा पत्रकार बांधवांना शक्तिवर्धक होमिओपॅथी औषधी च वाटप *महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचा उपक्रम*

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत स्वतः चा जीव धोक्यात घालून पत्रकारिता करणाऱ्या जिंतूर येथील पत्रकार बाधवांना शक्तिवर्धक औषधी च वाटप आज श्री नगरेश्वर मंदिर जिंतूर येथे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा कडून करण्यात आले.
आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सध्याच्या परिस्थितीत आर्सेनिक अल्बम 30 ही होमोओपॅथि औषध प्रतिकार शक्ती(immunity power) वाढविण्यास मदत करते आणि कोरोना होणास परावृत्त करते .ही बाब लक्षात घेता
उदगीर येथील प्रसिद्ध होमोओपॅथिक डॉक्टर संतोष कोटलवार यांनी स्वतः तयार केलेली होमिओपॅथी औषधी खास जिंतूर येथील कोरोना योध्ये पत्रकार बंधूना आर्यवैश्य महासभे कडून वाटप करण्यात आले
मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून डॉ संतोष कोटलवार यांनी महाराष्ट्रातील गरजवंत समाजबांधवा साठी पाच हजार बॉटल म्हणजेच सुमारे वीस हजार लोकांसाठी होमिओपॅथीक औषध “आव्होपा’ उदगीरच्या पुढाकाराने व महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेमार्फत मोफत वाटप करण्याचा संकल्प करून औषधी वितरणासाठी महासभेकडे सुपूर्द केल्या.अशी माहिती प्रदिप कोकडवार यांनी दिली.
डॉ कोटलवार यांनी आजतागायत होमिओपॅथीच्या माध्यमातून अत्यंत जर्जर असे रोग बरे करून लाखो लोकांना वेदनेतून मुक्ती दिली.मुतखडा, कॅन्सर,मूळव्याध, अपेनडिक्स, स्त्री रोग याबाबत चमत्कारिकरित्या उपाययोजना करून लोकांना बरे केले.हे करत असताना जगाच्या या वैश्विक कोरोनाच्या महामारीमध्ये पैसे कमावणे हे ध्येय न ठेवता सेवा म्हणून कार्य करत आर्सेनिक अल्बम 30 चे वाटप केले.या कार्याबद्दल समाजातून कौतुक होत आहे
प्रथम सर्व पत्रकाराचे स्वागत किरण वट्टमवार संजय कोकडवार सुनील वट्टमवार गजानन कोकडवार रुपेश चिद्रवार संजय चिद्रवार यांनी केले
औषधी वाटप वेळी जेष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर प्रेस क्लब अध्यक्ष मंचकराव जगताप मराठी पत्रकार संघाचे सचिव गुनिरत्न वाकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिंतूर शहरातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते