Breaking News

*आघाववाडीची लेक डॉ.सीमा कांदे-घुगे झाली नायब तहसिलदार!*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :-जिंतूर तालुक्यातील आघाव वाडी रहिवासी भिकाजीराव कांदे यांची लेक नुकत्याच झालेल्या एम पी एस सी ची परिक्षा पास होऊन नायब तहसीलदारपदी निवड झाली.
भिकाजीराव कांदे नोकरी निमित्ताने मुंबई मार्केट कमिटीत चतुर्थ श्रेणीत काम करतात, लेकरं शिकून मोठी व्हावीत अशी मनोमन इच्छा.
त्यांची लेक चिमेगाव (ता.औंढा)
डॉ.सिमा कांदे-घुगे यांचे १० वी पर्यंत चे शिक्षण गोखले हाय्यस्कुल खारघर येथे तर १२ विचे शिक्षण भारती विद्यापीठ बेलापूर येथे झाले. वैद्यकीय शिक्षण आर ए पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय वरळी मुंबई येथे झाले असून तेथेच त्यांनी MD केले. या यशामागे त्याचे पती डाँ.सुनील घुगे यांचा मोलाचा वाटा असल्याचे डाँ सीमा घुगे यांनी सांगितले.गावाकडच्या या पोरीचे समाजमाध्यमात विशेष कौतुक होत आहे.

स्पर्धा परीक्षेतील यश हे अनिश्चित आहे. पण आपण सातत्य ठेवले योग्य मार्गदर्शन मिळवले तर आपण नक्की यशस्वी होतो; सोबत कुटुंबातील माणसं सोबत असणे अत्यंत गरजेचं आहे. तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या जमेच्या बाजू ओळखून तयारी करावी. जमतं नसेल तर B प्लॅन तयार ठेवावा’.

*डॉ.सिमा कांदे-घुगे*
नायब तहसिलदार पदी निवड झालेली विद्यारर्थीनी

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close