लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या विटेकरांचा सत्कार

संपादक :- अकबर सिद्दीकी
परभणी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कक्ष अधिकारी संवगार्तून राज्यात प्रथम येण्याचा मान परभणीतील तरूण मुकूल मुकूंदराव विटेकर यांने पटकाविला आहे. नवोदय नंतर ११ वी १२ वी बेलेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेतले.आ.बाबाजानी दुर्राणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे मुकुल विटेकर यांनी बोलतांना सांगीतले.
परभणी शहरातील मुकूल मुकूंदराव विटेकर या तरूणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. या परिक्षेसाठी राज्यातून ३ लाख ६० हजार ९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेतून ६ हजार ८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. या परीक्षेत परभणीतील रहिवाशी मुकूल मुकूंदराव विटेकर हा तरूण कक्ष अधिकारी संवगार्तून राज्यात प्रथम आला आहे. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी येथे सलग दोन वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी पूर्ण केली. त्या ठिकाणी डॉ. विवेक कुलकर्णी व सविता कुलकर्णी यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. तसेच परभणी जिल्हयाचे खासदार संजय जाधव,आ.बाबाजानी दुर्राणी,आ. राहुल पाटील,मा.आ.सुरेश देशमुख यांनीही कौतुक केले. पत्रकाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बहुभाषीक पत्रकार संघाचे ़अध्यक्ष हमीद मलीक, मनपा प्रसिध्दी प्रमुख राजकुमार जाधव पत्रकार मोईन खान,मुकुंद विटेकर आदी उपस्थित होते.