शहरात सफा बैतुल मालच्या वतीने गरीबांना धान्याच्या किटचे वाटप

संपादक :-अकबर सिद्दीकी
परभणी : प्रतिनिधी
येथील सफा बैतुल मालच्या वतीने गत तीन महिन्यापासून गोर गरीबांना अन्नधान्याचे व राशनचे कीट वाटप करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून २२ जून रोजी सकाळी ११ वा. जुना मरकज सफा बैतुल मालच्या कार्यालयात गोर गरीबांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
देशात व राज्यात लॉकडाऊन लागल्यापासून सफा बैतुल माल संस्थेच्या वतीने गोर गरीबांना मदत करण्यात येत आहे. त्यात धान्य,राशन किट,तर कधी रोख ्शा प्रकारे केली जात आहे. गोर गरीबांच्या मदतीसाठी अहोरात्र धावून जाणारी एकमेव संस्था असून या संस्थेच्या वतीने अनेक निराधारांना आधार देण्याचे काम आजवर केलेले आहे.मागील काळात जिल्हाधिकारी व तहसिलदारांच्या हस्तेही अनेक वेळा धान्याचे वाटप करणयात आले आहे. यावेळी अध्यक्ष डॉ.अनवर् अली शाह, पत्रकार मोईन खान,समाजसेवक अब्दुल बाखी, शिक्षक शेख अलीमोद्दीन,डॉ. हबीब अली शाह सह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.