Breaking NewsJINTURnews

परभणी जिल्ह्यत दोन दिवसात 17 कोरोना रूग्ण जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी चा घेतलेला निर्णय उपयोगी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :-अकबर सिद्दीकी

परभणी :- जिल्ह्यतील नागरिकांनी आता खऱ्या अर्थाने सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यत स्थानीक नगरिकात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी 3 जुलै या एकाच दिवशी तब्बल सात रुग्ण तर 4 जुलै रोजी 10 रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा देखील खडबडून जागी झाली आहे. विशेष म्हणजे कालचे सात रुग्ण हे शहरातील महत्त्वाच्या भागात आढळून आल्याने व आज पुन्हा नवीन 10 रुग्ण हे पाथरी, पूर्ण,पभणी, येथील मिळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी चा घेतलेला निर्णय आज उपयोगी आला असल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे

परभणी शरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्याआठवडाभरापासून दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. शुक्रवारी दिनांक 3 जुलै रोजी कोरोनाबाधित एकूण सात रूग्ण आढळून आले त्यात परभणी शहरातील नाथनगरमध्ये दोन, तर काद्राबाद प्लॉट, अजिजिया नगर, पंचशील नगर व विकास नगरमध्ये प्रत्येकी एक कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहेत तसेच आज 4 जुलै रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयातून नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस संशयितांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. शनिवारी दुपारपर्यंत त्या प्रयोग शाळेत स्वॅब प्रलंबित होते. आज दुपारच्या सुमारास ई-मेलद्वारे त्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले आहे. यात 10 रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या १३९ एवढी झाली आहे. आतापर्यंत एकूण चार मृत्यू झाले आहेत.
जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी संचारबंदी चा घेतलेला निर्णय उपयोगी आला असून नागरिकांनी सावधगिरीने रहाणे गरजेचा आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close