Breaking News

परभणीत इनकमिंग रस्त्यावर कोरोना तपासणी पथकाची नजर

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक ;-अकबर सिद्दीकी
जनसमर्थक  :-  परभणी शहर महानगरपालिकेच्‍या वतीने शहरातील गंगाखेड नाका, पाथरी रोडवरील नाका, खानापुर फाटा या तिन ठिकाणी स. ०५.०० ते स. ९.०० वा पर्यंत कोव्हिड योद्धा म्‍हणून २५ जणांचे पथक काम करणार आहे. या संदर्भात आयुक्‍त देविदास पवार यांचे अध्‍यक्षतेखाली सदर पथकातील सदस्‍यांची बैठक घेण्‍यात आली. यावेळी आरोग्‍य अधिकारी डॉ. कल्‍पना सावंत, महानगरपालिकेचे क्रिडा समन्‍वयक सुशिल देशमुख, गजानन जाधव हे उपस्थित होते. या बैठकीमध्‍ये डॉ. कल्‍पना सावंत यांनी सर्वप्रथम परभणीचे कोरोना योद्धा यांचे स्‍वागत केले. शहरात कोरोना बाधीत रुग्‍ण वाढत असल्‍याने आम्‍ही शहराच्‍या तिनही प्रवेशद्वारामध्‍ये बापु सेवाभावी संस्‍थेचे सदस्‍य डॉक्‍टर, नर्स ई. यांचे पथक तैनात केले असल्‍याची माहिती दिली.

आयुक्‍त देविदास पवार यांनी कारेाना योद्धा हे स्‍वत:हून शहराच्‍या मुकख्‍य प्रवेशमार्गांवर स. ०५.०० ते स. ९.०० वा पर्यंत उपस्थित राहून शहरात येणा-या नागरीकांची तपासणी करणार आहेत. बाहेर जिल्‍ह्यातून येणा-या नागरीकांपैकी ज्‍या नागरीकांना ताप असेल अशा नागरीकांना क्‍वारंटाईनचा शिक्‍का मारणे, आवश्‍यकता असल्‍यास रुग्‍णालयात दाखल करण्‍यात येणार आहे.

तसेच शहरामध्‍ये मुख्‍य चौकात येणा-या नागरीकांना NCC चे विद्यार्थी यांच्‍या मार्फत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठीच्‍या उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. शहरातील स्‍लम परिसरात महापालिका एएनएम मार्फत नागरीकांची आरोग्‍य तपासणी केली जात आहे.

यावेळी महेश पाटील यांनी परभणी योद्घा यांच्‍याशी समन्‍वय साधला शहरात दुस-या टप्‍पयात कोरोना रुग्‍ण वाढले आहेत त्‍यामुळे नागरीकांनी जिवनावश्‍यक/आरोग्‍य सेवे शिवाय ईतर कोणत्‍याही कारणास्‍तव घराबाहेर पडू नये, असे मत व्‍यक्‍त केले. तसेच महापालिकेचे आरोग्‍य व स्‍वच्‍छता कर्मचारी चांगल्‍या पद्धतीनेकाम करत असून ते गौरवास्‍पद असल्‍याची भावना महेश पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

या कार्यक्रमांचे प्रास्‍तावीक सुशील देशमुख यांनी परभणी योद्धा या कल्‍पनेतून शहरातील ८० सदस्‍यांचा ग्रुप पैकी २५ सदस्‍य सध्‍या काम करणार असून आवश्‍यकतेनूसार सदस्‍य संख्‍या वाढविण्‍यात येणार असल्‍याचे, परभणी आयसीयु चे वैद्यकीय पथकही दोन तास सेवा देणार असल्‍याची माहिती देऊन देविदास पवार साहेबांनी कोरोन योद्धा म्‍हणून काम करण्‍याची संधी दिल्‍याबद्दल आभार व्‍यक्‍त केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close