Breaking News

*भोगावदेवीपर्यटनस्थळावर उभारली जाणार सह्याद्री देवराई* *अण्णा जगताप, रवी देशमुख सोबत आता चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांचा पुढाकार*.

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जनसमर्थक  :- परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथे मागील दीड वर्षापासून एकमुलतीसझाडे अभियानाअंतर्गत संस्थांनच्या 70 एकर जमिनीवर अण्णा जगताप आणि रवी देशमुख भोगावदेवीपर्यटनस्थळ उभे करत आहेत.या वर्षीपासून या भोगावदेवीपर्यटनस्थळावर सह्याद्री देवराई उभी करण्यासाठी चित्रपट अभिनेते वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.
मागील दीड वर्षापासून लावलेली रोपे सात ते आठ मोठी झाले आहेत. हळूहळू पर्यटन स्थळाचा परिसर हिरवागार होत चाललेला आहे. महाराष्ट्रातील पहिली शेतकरी उपयोगी फळबाग उभी केली जाणार आहे. हाती घेतलेलं काम हळूहळू पूर्णत्वास यायला लागलेले आहे. जिल्ह्यातील अनेक जाणकार मंडळी हे पर्यटन स्थळ उभे करण्यासाठी पुढे आली आहेत. या पर्यटन स्थळाच्या माध्यमातून परिसरातील अनेक जणांना फायदा होणार आहे. सद्य परिस्थितीमध्ये संस्थांनची 70 एकर जमीन, मंदिराच्या बाजूला असलेला मोठा तलाव व पाठीमागच्या अजिंक्ठ्यांच्या रांगेमध्ये वन विभागाची जमीन येथे काम करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. पर्यटनासाठी परभणी जिल्ह्यातील व परिसरातील पर्यटकांना कोकणामधे किंवा इतर ठिकाणी जावे लागते. मराठवाड्यामध्ये एखांदा असा परिसर किंवा मोठी बाग नाही. निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षण व्यतीत करता येईल व त्या बागेचा फायदा माणवा बरोबरच पशू पक्ष्यांनाही होईल. हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून पर्यटन स्थळ विकसित केल्या जात आहे. त्यामध्ये प्रत्येक फळझाड तर असतीलच त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्याची साधने व बोटींगची व्यवस्था, शेतकरी साधनांचे संग्राहालय देखील करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जेणेकरून पर्यटक आकर्षित होऊन आपल्याच भागात पर्यटनासाठी येतील.याचाच एक भाग म्हणून या पर्यटनस्थळावर चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे हे अण्णा जगताप आणि रवी देशमुख यांच्या मदतीसाठी सह्याद्री देवराई पर्यटन स्थळावर उभी करण्यासाठी सरसावले आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराई चा प्रकल्प हाती घेतला आहे. लवकरच ते उपस्थित राहून सह्याद्री देवराई पर्यटनस्थळावरती वृक्षलागवड करून सुरुवात करणार आहेत.
चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे पर्यटन स्थळावर सह्याद्री करण्याचे निश्चित केल्यामुळे परभणी जिल्ह्यातील वृक्षप्रेमी सुखावले आहेत.

*भोगावदेवीपर्यटनस्थळावर सह्याद्री देवराई उभी करण्यासाठी मी लवकरच येत आहे. अण्णा जगताप आणि रवी देशमुख बरोबरच परिसरातील जाणकर वृक्षप्रेमी, व्यापारी व प्रतिष्ठित मंडळींनी हे पर्यटन स्थळ उभे करण्यासाठी सहकार्य करावे. आई जगदंबेच्या परिसरात आपण सह्याद्री देवराई उभी करू या*.
*चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे*

*शेतकरी बापाची जीवनातील नैसर्गिक आणि आर्थिक दुष्काळ दूर करण्यासाठी एकमुलतीसझाडे अभियान काम करते. या अभियानाने भोगाव देवी येथे संस्थांच्या 70 एकर जमिनीवर पर्यटनस्थळ उभे करण्याचा निश्चय केला. मागील दीड वर्षापासून रवी देशमुख यांनी पुढाकार घेऊन काम सुरू केले आहे. आता चित्रपट अभिनेते या पर्यटनस्थळावर सह्याद्री देवराई उभी करण्यासाठी ण्यासाठी येत आहे आपणही सहभागी होऊन सहकार्य करावे*.

अण्णा जगताप
*एकमुलतीसझाडे अभियान*

*अण्णा जगताप, चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे आणि परिसरातील सर्व मिळून पर्यटन स्थळावर सह्याद्री देवराई करत आहोत. परभणी जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील वृक्षप्रेमी सहकार्य करावे. आपल्या परिसरांमधे आपण एक मोठे पर्यटन स्थळ व सह्याद्री देवराई उभी राहील. ज्याचा उपयोग परिसरातील सर्वांना होईल*.
रवी देशमुख
भोगाव देवीपर्यटन स्थळ सह्याद्री देवराई

या पर्यटन फळावर आंबा, चिंच, जांभूळ, रामफळ, सिताफळ, कवठ, बिबा, उंबर, वड, पिंपळ, लिंब, फिंरंगी चिंच,डाळिंब इत्यादी सारखे दीर्घकाळ टिकणारी फळझाडे लावली जाणार आहेत. परिसरातील जाणकार व्यापारी, उद्योगपती, शिकलेली, नोकरदार, समाजकारणी, समाजसेवक व राजकीय व्यक्तींना सहकार्य करण्याचे आवाहन भोगावदेवीपर्यटनस्थळ सह्याद्री देवराई मार्फत चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, अण्णा जगताप, रवी देशमुख यांच्यामार्फत केले जात आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close