Breaking NewsJINTURPATHRIPURNA

कृषी कार्यालयास सोयाबीनच्या तक्रारी घेण्यास नकार  संभाजी ब्रिगेडच्या मध्यस्थी शेतकरीला मिळाले न्याय

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :-अकबर सिद्दीकी

 

जनसमर्थक :- जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उगवण न झालेल्या सोयाबीनच्या तक्रारी स्विकारण्यास नकार देणाऱ्या तालुका कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना संतप्त संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरताच तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केल्याची घटना 7 जुलै रोजी घडली असून ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीनची उगवण झाली नाही अशा शेतकऱ्यांनी कंपनी व वितरकावर गुन्हे दाखल करण्यास पुढे यावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे

तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवण न झाले नसल्याच्या जवळपास 1500 तक्रारी तालुका कृषी कार्यालयाकडे दाखल आहेत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पंचनामे करण्याचे काम सुरू आहे मात्र अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पेरणीमुळे तक्रार अर्ज करण्यास उशीर झाला असल्याने शेतकरी कृषी कार्यालयात तक्रारी दाखल करण्यास जात आहेत परंतु काल 7 जुलै रोजी तालुक्यातील अनेक शेतकरी तक्रार अर्ज घेऊन कार्यालयात गेले होते मात्र कृषी कार्यालयातील सूचना बोर्डवर तक्रारी स्वीकारणार नसल्याची सूचना लावण्यात आली होती म्हणून याबाबत शेतकऱ्यांनी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर यांना माहिती दिली असता त्यांनी सहकारी बाळासाहेब काजळे,सुनील गाडेकर व शेतकरी संघटनेचे इर्शाद चांद पाशा यांच्या सोबत कृषी कार्यालयात जाऊन संबंधीत कर्मचाऱ्यांना धारेवर धरले यावेळी संतप्त संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून वरिष्ठ कार्यालयाकडून तसेच राज्य सरकारकडून कोणते पत्र आले ते दाखवा किंवा तक्रार घेणार नसल्याची लेखी द्या अशी मागणी करताच सर्व शेतकऱ्यांच्या तक्रार अर्ज स्विकारण्यास सुरुवात केली.यावेळी तालुक्यातील सोयाबीन उगवण न झालेल्या शेतकऱ्यांनी पुढे येऊन कंपनी व वितारकांवर गुन्हे दाखल करण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले.यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close