मुबंई “राजगृह” तोडफोड प्रकरणी समाजकंटकावर गुन्हे दाखल करा–वंचित बहुजन आघाडी राजगृहास कायमरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणी

संपादक:-अकबर सिद्दीकी
जनसमर्थक :- जिंतूर येथील वंचित बहुजन आघाडी तर्फे मुबंई येथील राजगृहास केलेल्या तोडफोड घटनेचा निषेध करत कार्यवाहीची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात मुबंई येथे स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर सात जुलै 2020 रोजी काही असामाजिक तत्वाच्या समाजकंटकांनी तोडफोड करून सदर राजगृहास विद्रूप करण्याचे कारस्थान केले. ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून समाजकंटकांनी तोडफोड करून सदर राजगृहास विद्रुप करण्याचे कारस्थान केले ही घटना अत्यंत दुर्दैवी असून हल्ला करणाऱ्या माथेफीरुस तत्काळ अटक करून या हल्ल्या माघे असलेल्या विकृत मेंदूचा सुद्धा तपास लावला व आरोपीचा शोध तत्काळ घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी अशी सुद्धा मागणी वंचित बहुजन आघाडीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना केलेल्या निवेदनात नमूद केलेली आहे तसेच राजगृहास कायमस्वरूपी पोलीस सुरक्षा तत्काळ प्रदान करावी. असेही निवेदनात नमूद केले आहे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी वाकळे, नामदेव प्रधान, सखाराम लोखंडे, सतीश वाकळे, शरद चव्हाण, भास्कर जाधव, सर्जेराव कांबळे, रवींद्र वाकळे, शिवाजी लोखंडे, हिम्मत खिल्लारे, प्रीतम वाकळे, उषाताई वाकळे, आशाताई खिल्लारे, सपनाताई घनसावंत उर्मिलाताई ठेंगे व सुमनताई प्रधान आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत