जोगवाडा -कवडा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम बोगस चौकशी करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

संपादक :- अकबर सिद्दीकी
जनसमर्थक :- जिंतूर तालुक्यातील जोगवाडा कवडा मार्गे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत निकृष्ठ झालेल्या डांबरीकरण रस्त्याची त्रयस्थ संस्थे मार्फत चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचा वतीने 9 जुलै रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जोगवाडा,सोस,सोनापूर,कवडा या मार्गावर डांबरी रस्त्याचे काम करण्यात आले असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे दोन महिन्यांपूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण सध्या जागोजागी फुटले असून खड्डे पडले आहेत याबाबत वेळोवेळी संबंधीत कार्यालयाशी गावकऱ्यांनी लेखी तक्रारी केल्या होत्या परंतु त्या कडे संबंधीत अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे त्यामुळे सदरील कंत्राटदाराने अंदाजपत्रकप्रमाणे काम केले नाही त्यामुळे दोन महिन्यातच रस्ता उखडून खड्डे पडत आहेत म्हणून त्रयस्थ ( third party ) संस्थे मार्फत
चौकशी करून दोषी अधिकारी,कर्मचारी व संबंधीत कंत्राटदार यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब काजळे व नयूम पठाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून या निवेदनाची प्रत मुख्यकार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद व कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय यांना देण्यात आली आहे.