Breaking NewsJINTURPALAMPATHRISPORTS

कदम यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

        संपादक :- अकबर सिद्दीकी

पालम प्रतिनिधी

जनसमर्थक :-  दिवसंदिवस वाढत असलेला कोरणा रोगाचा प्रादुर्भाव आळा घालण्यासाठी तालुक्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी राहण्यास आदेशित करावे अशा आशयाची मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामप्रसाद कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती करण्यात आलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक घेऊन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे

पालम तालुक्यात विविध शासकीय कार्यालय कार्यरत असून या कार्यालयात काम करणारे कर्मचारी मात्र कामाच्या ठिकाणी न राहता गंगाखेड. नांदेड.परभणी.परळी या शहरातून दररोज अपडाऊन करत आहेत करीत असलेल्या डाऊन’मुळे तालुक्यातील कोरणा चा संसर्ग वाढू शकतो यामुळे शहरातील काम करणाऱ्या पंचायत समिती कार्यालय. भूमिअभिलेख कार्यालय. तालुका कृषी कार्यालय. प्रमुख महामार्ग रस्ते विभाग. ग्रामीण रुग्णालय राष्ट्रीयकृत बँक या यासह इतर ठिकाणी काम करणारे कर्मचारी दररोज कामानिमित्त शहरातील कार्यात येत असतात परंतु जिल्ह्यासह इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना रोगाचा प्रसार झाला असून हा संसर्गजन्य रोग पालम तालुक्यात नसल्याने भविष्यात ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हा संसर्ग वाढू शकतो यामुळे त्याचा बचाव करण्यासाठी अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्याला बंद करावे अशा आशयाचे पत्र युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी केली होती त्या मागणीची दखल मुख्यमंत्री यांनी घेत संबंधित पत्र जिल्हाधिकारी दिल्यामुळे त्याचे सर्व स्थळातुन कौतुक होत आहे

—चौकट —-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालम येथील अपडाऊन करणारे अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे अशी मागणी मी माननिय मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे साहेब यांच्या कडे मेल द्वारे केली होती,त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातुन प्रत्युउत्तरादाखल मला मेल आला , पुढील कार्यवाहीसाठी मा.जिल्हाधिकारी परभणी यांना कळवले आहे, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्यासाठी सुचना मिळेल अशी अपेक्षा आहे.
*रामप्रसाद कदम*
महासचिव,परभणी जिल्हा युवक काॕंग्रेस.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close