Breaking NewsJINTURSONPET

◆जिंतूरात एक Asi बडतर्फ, 4 पोलीस निलंबित तर एकाची तडकाफडकी बदली, ◆दारू माफिया ला मदत करणे भोवले ; एसपींची कारवाई,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जनसमर्थक :- जिंतूर तालुक्यातील ईटोली येथील सुरेशलाला जयस्वाल या दारू माफिया ला दारूचा व्यवसाय करण्यासाठी मदत करणार्‍या 6 पोलीस कर्मचार्‍यांविरूध्द परभणीचे पोलीस अधीक्षक यांनी आज शुक्रवार दि.18 जुलैं रोजी कारवाई केली आहे.

जिंतूर पोलीस ठाण्याच्या एका Asi दर्जा च्या कर्मचार्‍याला शासकीय सेवेतून बडतर्फ, चार जणांना निलंबीत तर एकाची पोलीस मुख्यालयात बदली केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.
जिंतूर पोलिस ठाण्याचे परमेश्वर काकडे यांना बेकायदेशीर दारूविक्रेत्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून मदत केल्याच्या आरोपावरून आज बडतर्फ करण्यात आले. तर शेख अजगर, नामदेव डुबे, राहुल शेळके , साजीद लाला या चौघांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच सिध्देश्वर चाटे यांची परभणी मुख्यालयास बदली करण्यात आली आहे.
जिंतूर तालुक्यातील ईटोली येथील रहिवासी सुरेशलाला जयस्वाल याचा बेकायदेशीर दारू विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. लॉकडाउनच्या काळात त्याने जिंतूर पोलीस ठाण्याच्या पोलिस कर्मचार्‍यांच्या सहकार्याने संपुर्ण तालूक्यात बेकायदेशीर दारूची विक्री मोठ्या प्रमाणात केली. जयस्वाल याने एका स्कार्पिआमधून गावागावात दारू नेवून पोहोचवून दारूचा व्यवसाय केला. गेल्या महिन्यात जिंतूर -येलदरी रोडवर जाणारी स्कॉर्पिओ जीप थांबवून जिंतूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी चौकशी केली असता त्यामध्ये दारूचा अवैध साठा आढळून आला. जीपचालकासह एका आरोपीस अटक करून पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता सदरील माल सुरेशलाला जयस्वाल याचा असल्याची माहिती अटकेतील आरोपींनी दिली. डीवायएसपी श्रवण दत्त यांनी तात्काळ सुरेश जयस्वाल यास अटक केली. त्याचा मोबाईलही जप्त केला. त्यास जिंतूर न्यायालयासमोर उभे करून पोलीस कस्टडीची मागणी केली असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी जयस्वाल यास सुनावली. डीवायएसपी श्रवण दत्त यांनी कसून तपास केला असता अनेक महिन्यांपासून जयस्वाल याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली. जिंतूर पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यासह परभणी ़स्थानिक गुन्हे शाखेचेही काही पोलिस कर्मचारी जयस्वाल यास मदत करत होते. या सर्वांची आर्थिक देवाणघेवाण सुरू होती हे तपासात निष्पन्न झाले आहे. जयस्वाल याच्या मोबाईलमध्ये त्या सर्वांचे संभाषण असल्याचाही पुरावा डीवायएसपी Ipsश्रवण दत्त यांच्या हाती लागला. ही सर्व माहिती श्रवण दत्त यांनी पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना सांगून या सर्व पोलिस कर्मचार्‍यांविरूध्द कारवाईची शिफारस केली. त्यावरुन जिंतूर 6 कर्मचार्‍यांवर आज कारवाई करण्यात आली. परभणी एलसीबीचे तीन पोलीस कर्मचारी हे गेल्या महिन्यातच निलंबित करण्यात आले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close