Breaking NewsJINTURPOITICSSPORTS

दुधाच्या अनुदानासाठी रासपाचा एल्गार मोफत दूध वाटप करून वेधले राज्य शासनाचे लक्ष

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

        संपादक :- अकबर सिद्दीकी

पालम बातमीदार

दुधाला प्रति लिटर दहा रुपये व दूध पावडर साठी प्रति किलो 50 रुपयाचे अनुदान देण्यात यावे या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पालम तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने 1 रोजी शनिवारी शहरात मोफत दूध वाटप करण्यात आले

शेतकऱ्यांना चारा व जनावरांचे खाद्य महागड्या किमतीने विकत घेऊन पशुधन सांभाळावे लागत आहे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत आहे परंतु सदरील व्यवसायाकडे राज्य शासन गांभीर्याने पाहत नसून कवडीमोल भावाने दूध खरेदी करीत आहे तसेच लाँकडाऊन झाल्यामुळे घरोघर जाऊन दूध विकता येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुधाची नासाडी होत आहे राज्य सरकारकडून अल्प दराने दूध खरेदी केल्यामुळे व दुधाला अनुदान दिले जात नसल्यामुळे दुधाचा व्यवसाय तोट्यात जात असून शेतकरी शेतमजूर देशोधडीला लागला आहे त्यामुळे दुधाला किमान प्रति लिटर दहा रुपये अनुदान व दूध पावडरला प्रतिकिलो 50 रुपयाचे अनुदान देण्यासाठी 1 रोजी आंदोलन करण्यात आले
राज्य शासनाचे लग्न लक्ष वेधण्यासाठी शहरात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मोफत दूध वाटप करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आ. रत्नाकरराव गुट्टे मित्रमंडळाचे पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे रासपचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कुरे, भगवान शिरस्कर, तायारखा पठाण, गणेश दुधाटे, नवनाथ पोळ, पिरखान पठाण शिवराम पैके,अकतर भाई, शेख मेहबूब लखन वाघमारे ,अधी कार्यकर्ते उपस्थित होते
*चौकट*
राज्य सरकारने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार
माधवराव गायकवाड शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाची निवड केली होती दूध व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून पशुधन उभे केले होते राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन दुधाला व दूध पावडर ला तातडीने अनुदान द्यावे अन्यथा यापुढे व्यापक जनआंदोलन करण्याचा इशारा आ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे प्रभारी माधवराव गायकवाड यांनी दिला आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close