Breaking NewsJINTURnewsPOITICSSELUSONPETSPORTS

आ.गुट्टे यांच्यासह आंदोलकावरील गुन्हे मागे न घेतल्यास रासप मित्रमंडळ करणार आंदोलन

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

पालम /प्रतिनिधी :- दुधाच्या दरात वाढ करावी या मागणीसाठी एक ऑगस्ट रोजी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह भाजप रिपाईच्या कार्यकर्त्यांनी गंगाखेड येथे आंदोलन केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असून सदरील गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा मित्र मंडळाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार पालम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे
राज्यभरात शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर एक ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते गंगाखेड शहरातही रासप भाजप रिपाई महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले मात्र या आंदोलनातील आमदार डा. रत्नाकरराव गुट्टे यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यावंर गुन्हे दाखल करण्यातआले आहेत. हे गुन्हे दाखल करणे म्हणजे लोकशाहीतील विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा हिणकस प्रकार असून हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी आ. डाँ रत्नाकरराव गुटे मित्रमंडळ व रासपच्या वतीने करण्यात आली आहे.
दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावंर काल 1 आगस्ट रोजी राज्यभरात रास्तारोको व अन्य प्रकारे आंदोलन करण्यात आले.दुध उत्पादक शेतकर्‍यांना महागडे पशुखाद्य विकत घेवून पशुधन जगवावे लागत आहे. सरकार मात्र घाट्यात जाणार्‍या या शेतकर्‍यांच्या दुधाला भाव देत नाही, पूर्वीच्या सरकारनं दुधाला 35 रुपये भाव दिला होता मात्र हे सरकार तो भाव सुध्दा देवू शकले नाही त्यामुळे राज्यभरात आंदोलने करण्यात आली. गंगाखेड शहरात देखील आमदार डॉ. रत्नाकरराव गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली परळी नाक्यावर आंदोलन करण्यात आलं. कोणताही अप्रिय प्रकार घडलेला नसतांनाही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक आमदार गुट्टे यांच्यासह अन्य 15 ते 20 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन आंदोलन दपडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य सरकारला वठणीवर आणण्यासाठी भाजप-रासप-रिपाई महायुती कटबीध्द असून कितीही गुन्हे दाखल केले तरी अशा प्रश्‍नांवर आंदोलन करतच राहणार आहोत
शेतकर्‍याचे प्रश्‍न सोडविणे हे राज्य सरकारचे प्राधान्यक्रमाचे काम आहे राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर मोठे आंदोलन करण्यातआले. यापूर्वी आदोलन करणार असलयाचे पत्र देण्यात आलेले असतांनाही गुन्हे का दाखल केले, प्रशासनाला विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करावयाचा आहे का असा प्रश्‍न पडला असुन जाणीवपूर्वक केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी केली जात आहे राज्यातील शेतकर्‍यांना खत उपलब्ध होत नाही, बोगस सोयाबीनचे बियाणे विक्रीकरुन शेतकर्‍यावर दुबार पेरणीची वेळ या सरकारमुळेच आली आहे. शेतकर्‍यांचय प्रश्‍नावर 1 आँगष्ट रोजी केलेल्या आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोटे असून लोकशाहीहीत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही निवेदनात केला आहे दाखल केलेले तात्काळ गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मित्र मंडळाचे पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे रासपचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कुरे शेख गोस,असतखाँ पठाण,ऊबेदखाँ पठाण, गणेश दुधाटे विनायक पौळ,नवनाथ पौळ,इस्माईल शेख भारत डोणे,तायरखा पठाण चंद्रकांत पोळ, चंद्रकांत गायकवाड, आदींनी दिला आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close