कोव्हिड योद्धा म्हणूनअनेकांना केले सन्मानित पत्रकार संघाचे नाईकवाडे यांचाही समावेश

संपादक :- अकबर सिद्दीकी
पालम प्रतिनिधी
स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून कोरोना संकटात उल्लेखनीय काम करणार्या पत्रकार. डॉक्टर महसूल कर्मचारी यासह इतर कार्यक्षेत्रातील काम करणाऱ्या योद्धाचा तहसीलदार ज्योती चव्हाण यांच्या हस्ते दि. 15 शनिवार रोजी पत्रकारितेत काम करणारे मारोती नाईकवाडे यांच्यासह अनेकांचा सन्मान करण्यात आला
शहरात तहसील कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर नायब तहसीलदार प्रकाश गायकवाड.ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ भालेराव.तालुका आरोग्य अधिकारी कालिदास निरस. आधीच उपस्थित तालुक्यातील वढत असलेला कोरणाचा प्रसार रोखण्यासाठी व यावर उपाय योजना करण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून उल्लेखनीय काम करीत असलेले तसेच विविध खात्यातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालयात पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मारोती नाईकवाडे.वैद्यकीय क्षेत्रातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सिद्धार्थ भालेराव निरज मुरूळे. पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने. सुधाकर मुंडे. नगर पालिकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष लोमटे. आशा वर्कर पांचाळ. स्वच्छता विभागातील भागाबाई शिंदे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी