Breaking NewsJINTURnewsSPORTS

विवाद से विश्वास तक … प्राप्तिकर कायदा :दृष्टीक्षेप -प्रा डॉ ए बी मुगुटकर

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जनसमर्थक :- कोरोना नावाच्या या जागतिक संकटाच्या काळात, आज समाजातील प्रत्येकाला सरकारने आपल्याला सर्व सोयी, सुविधा, सवलती उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असे वाटू लागले आहे, नव्हे तर ती सरकारची जबाबदारी आहे असे प्रत्येक जण म्हणू लागला आहे. एवढेच नाही तर मागण्यांची ही श्रृंखला सतत वाढतच आहे. कुठल्याही गोष्टीची परिपूर्ती करण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. सरकार कडे आर्थिक पुरवठा हा अनेक माध्यमातून होत असला तरी त्यातील मोठा वाटा हा करसंकलनाच्या रुपाने जमा होत असतो. आपल्याकडे करसंकलन हे दोन प्रकारे होते. एक प्रत्यक्ष कर आणि दुसरे अप्रत्यक्ष कर. सध्याचा प्राप्तिकर कायदा आणि त्याचा करसंकलना मध्ये असणारा मोठा हिस्सा हा प्रत्यक्ष कर या प्रकारात मोडतो. त्यामुळे या कायद्याशी व्यक्ती, व्यापारी, संस्था, आस्थापना यांचा प्रत्यक्ष संबंध येतो. इंग्रजांच्या काळापासून असलेला हा कायदा आजपर्यंत प्रत्येकाला अप्रिय असाच वाटत आला आहे. त्याचे कारण म्हणजे यामध्ये असलेल्या जाचक अटी, नियम, तरतुदी, नियमभंगाच्या शिक्षा, उत्पन्ना नुसार वाढत जाणारी कर संरचना, कायद्याचा होणारा दुरुपयोग या व इतर अनेक गोष्टी मुळे याची भीती वरचेवर वाढत जाऊन लोकांचा सहभाग कमी होत गेला.
तसेच प्राप्तिकर भरणाऱ्या कडे संशयाने पाहण्याची दृष्टी, प्राप्तिकरदाता म्हणून अप्राप्त होणारी सन्मान जनक वागणूक तसेच जो भरतो तोच मरतो या अनुभवामुळे यापासून दूर राहण्याची प्रबळ होणारी भावना वाढीस लागु लागली. त्याचाच परिणाम म्हणून आजही आपल्या 130 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये फक्त पाच कोटी ( म्हणजे फक्त चार टक्के जे की इतर विकसित देशांच्या तुलनेत अगदी नगण्य ) प्राप्तिकर भरणारे आहेत हे ऐकून आश्चर्य वाटत नाही.
एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांचे आयुष्यमान उंचावण्यासाठी, आपत्कालीन आणि भविष्यातील उपाय योजनांची परिपुर्ती करण्यासाठी खरेतर ही संख्या खूप मोठी असायला हवी होती. पण कायद्याची असणारी भिती, दहशत, कायदा राबविणाऱ्या नोकरशाहीची मानसिकता इत्यादी अनेक गोष्टी यात अंतर्भूत आहेत.
त्यामुळे Transparent Taxation – Honouring The Honest या नवीन प्राप्तिकर व्यासपीठाची स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी केलेली घोषणा स्वागतार्ह म्हणायला हवी. मागील अनेक दशकांपासून या कायद्यातील जाचक अटी कमी करणे, नोकरशाहीची करदात्या प्रती असणारी मानसिकता बदलणे, करदात्याला होणाऱ्या ञासाची तीव्रता कमी करणे, त्याला सन्मानजनक वागणूक देणे, तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना कर भरण्यासाठी जाग्रत करणे, खितपत पडलेल्या वाद प्रकरणांचा लवकर निपटारा करणे इत्यादी अनेक प्रस्तावित सुधारणा या निमित्ताने येऊ घातल्या आहेत. एकंदरीतच Good Governance च्या द्रष्टीने सरकारने केलेली ही सुरवातच म्हणावी लागेल.
पाण्यात राहून ज्या प्रमाणात मासा पाणी गृहण करतो तेवढ्याच प्रमाणात सरकारने जनतेकडून कररूपाने महसूल जमा करावा असे आर्य चाणक्य म्हणतो. तेव्हा प्रचलित असलेली कराची दर संरचना बदलून कर भरणाऱ्या लोकांवरचा बोजा कमी करणे आणि करभरण्या योग्य व्यक्ती आणि समुह यांची संख्या वाढविणे या बाबतीत सरकारने काम सुरू केल्याचे दिसून येते आहे.
तसेच करदात्याचे हक्क आणि कर्तव्ये याबाबत असलेली सुस्पष्ट नियमावली तयार करुन आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या करदात्याला सन्मानजनक वागणूक मिळवुन देण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न यातून दिसून येतो.
Faceless Assessment हे आणखी एक वैशिष्ट्य अधोरेखित करण्यासारखे आहे. ज्या मध्ये कर भरणारा व कर निर्धारणा करणारा या दोघांनाही एकमेकांना ओळखता येणार नसल्याने न्याय्य मुल्यांकन होण्यासंबधीचा विश्वास वाढीस लागणार आहे.
कर निर्धारण प्रकरणा मध्ये Fairness आणि Fearless चे प्रमाण यामुळे वाढीस लागुन, कर भरण्यायोग व्यक्तींची स्वयंप्रेरणा जागृत करणे, त्यांची संख्या वाढविणे यासारखी उद्दीष्टे लवकर पूर्ण करण्यास निश्चितच हातभार लागु शकतो. ज्या मुळे देशाच्या महसूलात वाढ होऊन सामान्यांच्या गरजांची परिपूर्ती करण्यासाठी तसेच देशाच्या भविष्यातील आर्थिक संकटांचा मुकाबला करण्यासाठी आणि आपली आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी सरकारने सकारात्मक सुरूवात केलेली दिसतेय.
त्याचाच एक भाग म्हणून विवाद से विश्वास तक या उपक्रमा अंतर्गत मागच्या काही दिवसात जवळपास तीन लाख विवादास्पद प्रकरणांचा निर्णय न्यायालया बाहेर झाला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.
अशा या प्रस्तावीत सुधारणांना येत्या 25 सप्टेंबर पासुन देशभरात लागु करण्यात येणार आहे ज्याचे सकारात्मक परिणाम येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला दिसुन येतील.
शेवटी प्रत्येक गोष्टीला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजु असतात तेंव्हा या बाबतीतही येणाऱ्या काळात आपल्याला प्रश्न आणि उत्तरे मिळु शकतात.
एकंदरीतच कोरोनाने अनेक संकटांना जन्म दिला असला तरी अनेक नवीन बदल, सुधारणा, व्यवस्था, प्रयत्न , संशोधन, संधी यांच्याही नव्या वाटा मोकळ्या करून दिल्या असेच म्हणावे लागेल.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close