Breaking Newsnews

आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या प्रयत्नामुळे जनावरांच्या लंपी स्कीन डिसीजवर लस उपलब्ध: 0 आज पासुन लसीकरणास सुरुवात

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

पालम/प्रतिनिधी
जनसमर्थक :-   गेल्या पाच महिन्यापासून कोरोनाच्या दुष्टच क्रात अडकलेल्या शेतकर्‍यांवरील संकटांची मालीका सुरुच असल्याचे दिसून येत असून निसर्गाच्या लहरीपणाबरोबरच शेतकर्‍यांच्या पशुधनाला लंपी स्कीन डिसीज हा भयंकर आजार होत असल्याचे दिसून आल्यावरुन गंगाखेडचे आमदार डाँ. रत्नाकर गुट्टे यांनी तातडीने शेतकर्‍यांच्या पशुधनाला वाचविण्यासाठी या आजारावरील लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा पशुधन अधिकार्‍यांशी वारंवार संपर्क साधून तातडीने या लस उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार डाँ. गुटे यांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळं आता मतदारंसघात लंपी स्कीन डिसीजवर लस उपलब्ध झाली असून आज पासून लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहितीजिल्हा पशुधन अधिकारी डॉ. लोने, पशुधन विकास अधिाकरी डाँ. संजय पुराणिक यांनी आमदार गुट्टे यांना दिली आहे.
कोरोनाच्या संकटानंतर शेतकर्‍यांना बोगस बियाणे आणि त्यानंतर पावसामुळे शेतातील मुग व उडीदाचे पिक हातचे गेल्याने शेतकरी हैराण झाले होते. हाती आलेले पिक गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. त्यातच शेतकर्‍यांच्या पशुधनाला लंपी स्कीन डिसीज हा संसर्गजन्य आजार मतदारसंघात झाल्याचे लक्षात आल्यावरुन आमदार डाँ. रत्नाकर गुट्टे यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मतदारसंघात या आजारावरील लस उपब्ध करुन देण्याची मागणी केली होती. मतदारंसघातील पशुवेद्यकीय दवाखान्यात ही लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक जनावरे दगावल्याची माहिती मिळाल्यावरुन आमदार गुट्टे यांनी पशुधन विकास अधिकारी, जिहल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून याविषयीचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर 27 आगस्ट रोजी गंगाखेड मतदारंसघात लंपी स्कीन डिसीजवरील लस उपलब्ध झाली असून संपूर्ण मतदारसंघात शुक्रव
आजपासून लसीकरण सुरु करण्यात येणार असल्याची महिती जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. लोने गंगाखेड पंचायत समितीचे पशुधन विकास अधिाकरी डॉ. पुराणीक, पूर्णचे पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीनिवास कारले.डॉ. परगे यांनी यांनी दिली आहे.त्याच बरोबर मतदारसंघातील ज्या शेतकर्‍यांचे जनावरे मृत्यमुखी पडले आहेत त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही आमदार गुट्टे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलीआहे
आमदार डाँ. रत्नाकर गुट्टे यांनी मतदारंसघातील प्रत्येक नागरिकाला आपल्या कुटूंबातील सदस्याप्रमाणे समजून त्यांच्या अडचणी समजून घेवून त्या सोडविण्यासाठी तत्परता दर्शविली आहे. शेतकर्‍यांच्या पशुधनाचा मोठा प्रश्न आमदार गुट्टे यांनी मार्गी लावला आहे. त्यांच्यामुळेच ही लस उपलब्ध झाली असून पशुधन वाचविण्यात त्यांना यश आले आहे. त्यांच्या या कार्यतत्परतेबद्दल मतदारंसघातील नागरिकांकडून आमदार गुट्टे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close