Breaking Newsnews

*राहुल लोणीकरांच्या निवडीमुळे जिंतुर तालुक्यासह परभणी लोकसभा मतदारसंघात पक्षवाढीला बळ मिळणार – लक्ष्मण पि. इलग*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

         संपादक :- अकबर सिद्दीकी
जनसमर्थक :-  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहिर झाली असून परभणी लोकसभा मतदार संघातील भाजपाचे तरूण नेतृत्व मा. राहुल बबनराव लोणीकर यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे भारतीय जनता पार्टीला पुरेसा लाभ होईलच परंतु मराठवाड्यात पहील्या पासुनच राहुलभैय्या लोणिकर यांची युवा मोर्चा मध्ये असलेली उत्तम कामगीरी आणि जनतेतील प्रचंड असा जनसंपर्क यामुळे जिंतुर तालुक्यासह परभणी लोकसभा मतदारसंघात पक्ष वाढीला निश्चितच त्यांच्या निवडीमुळे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर परतुर पं. स. च्या सभापती पदासह जालना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशस्वीरित्या सांभाळुन सध्या विद्यमान सदस्य असल्याकारणाने प्रशासनाचा देखील दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे.
लोनिकरांनी पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्याआहेत गतवर्षी भाजपा युवा मोर्चा आयोजित मुख्यमंत्री चषक स्पर्धेत खेळाडूंची सर्वाधिक नोंदणी आणि सर्वाधिक सामन्यांचे आयोजन त्यांनी केले त्याचबरोबर युवा मोर्चाच्या माध्यमातुन मराठवाडा स्तरावर रक्तदान शिबिराचे आयोजन करून नऊ हजार सातशे बॅग चे संकलन करून पक्षाने ठरवुन दिलेल्या उपक्रमांमध्ये राहुल लोणीकरांनी सहभाग नोंदवून ते यशस्वी करून दाखविल्यामुळेच प्रदेश सरचिटणीस हे महत्वाचे पद त्यांना देण्यात आले आहे. भाजपा युवा मोर्चा च्या माध्यमातुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी राहुल लोणीकरांवर सोपवल्यामुळे निश्चितच परभणी लोकसभा मतदार संघासह जिंतुर तालुक्यात पक्षवाढीसाठी फायदा होणार यात शंका नाही.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close