Breaking News

“कोव्हिडं संबधी उपाययोजना बंद, “सर्वसामान्य चिंतेत तर प्रशासन उदासीन”  

 

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

     कार्यकारी  संपादक :- प्रदीप कोकडवार

जिंतूर :- कोरोना संसर्ग वाढत्या क्रमाने असून शहरातील कोव्हिडं बाधित संख्या आजच्या तारखेला 173 होऊनही तालुका प्रशासन संसर्ग वाढू नये म्हणून जिंतूर शहरातील करण्यात आलेल्या उपाययोजना एक एक करून बंद करीत आहे की काय असे चित्र सद्या दिसत आहे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर होत नाहीत,

बाधित रुग्णाचे ठिकाण प्रतिबंधित  करण्यात येत नाहीत गर्दी नियंत्रित करण्यासाठी न प व पोलीस प्रशासन यांनी खुप मेहनत घेऊन शहरात सर्व नियोजन टॉप टीप लावले होते

शहरात एक जरी रुग्ण आढळला तरी 4 दिवस कडेकोट बंद झाले आणि सर्व  उपाय योजना करण्यात येत होत्या आज तालुका आरोग्य विभागाच्या वतीने मिळालेल्या माहिती वरून रुंगणाची संख्या 173 पर्यंत जाऊन पोहचली तरी प्रशासनाने का मोकळे सोडले हे सामान्य नागरिकांना न उलगडणारे कोडे आहे म्हणून शहरातिल नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे

या परिस्थिती मुळे नागरीक पण कोणतेही नियम पाळायला तयार नाहीत

शहरात गणेशोत्सव असल्याने पोलीस दला कडुन जादा कुमक मागवली पण या बाबत त्यांना काय जबाबदारी दिली होती हे पण सर्व सामान्यांना कळलं नाही एकंदर कोव्हिडं वाढत असताना व संपूर्ण संसर्ग कमी होण्यापूर्वीच प्रशासन का गप्प आहे हे मात्र सामान्य व्यक्तींना कळन अवश्यक वाटते

ता आपत्ती व्यवस्थापन समिती कडून उपाययोजना बंद करण्यात आल्या की अंमलबजावणी होत नाही या बाबत उदासीनता दिसून येते म्हणून संबंधित वरिष्ठांनी दखल घ्यावी असे नागरिकांत उघड पणे बोलले जात आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close