Breaking News

*सरस्वती विद्यालयाचे राम पाठक व श्याम बाजपेयी सेवानिवृत्त*

संपादक :- अकबर सिद्दीकी

  *गंगाखेड (प्रतिनिधी)*
शहरातील सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक राम कालिदासराव पाठक व ज्येष्ठ इंग्रजी शिक्षक श्यामनारायण रामनारायण बाजपेयी हे दोन मित्र 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर शासनाच्या नियत वयोमानाप्रमाणे दिनांक 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांना भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले तर प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तापडिया, सदस्य सुहास नळदकर, माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री ,तुकाराम कागणे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक रमेश गिराम यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही सत्कार मूर्तींचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक मठपती, घुगे ,महाजन, कातकडे, काळे ,संचालक सुहास नळदकर आदींनी दोघा विषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या .तर सत्काराला उत्तर देताना बाजपेयी यांनी थोडक्यात आपला शाळेतील जीवनप्रवास व्यक्त केला तर मुख्याध्यापक राम पाठक यांनीसुद्धा आपल्या भावना व्यक्त करताना विद्यालयातील माजी कर्मचारी, संस्थाचालक यांच्या आठवणींना उजाळा दिला .तसेच आपल्या कार्यकाळात विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले,व भविष्यात देखील शाळेची अशीच प्रगती होत रहावी यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नवनिर्वाचित मुख्याध्यापिका सुरेखा महाजन यांचा विद्यालयाच्या शिक्षक वर्गातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अनंत काळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन योग शिक्षक गोपाळ मंत्री यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी ,सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close