मूग उडीद पिकाचा नुकसानीची लेखी तक्रार घेण्याची मागणी
तालुका कृषी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- तालुक्यातील चौदा हजार हेक्टर वरील उडीद मुग पिकाची नासाडी झालेल्या क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांची लेखी तक्रार घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने 1 सप्टेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे
यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उडीद मूग या पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली होती. परंतु ऑगस्ट महिन्यात संततधार झालेल्या पावसामुळे या संपूर्ण पिकाचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्यामुळे हे उडीद मुगाचे पीक पांढरे पडले यामुळे बाजारात त्याला कवडीमोल दराने व्यापारी खरेदी करत आहेत. तर शेतकऱ्याचे झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे मात्र रिलायन्स विमा कंपनीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदविण्याचे सांगितले आहे परंतु अनेक शेतकऱ्यांना तक्रार कशी करावी याची माहिती नाही परिणामी त्यांना तक्रार नोंदविण्यास अडचणी निर्माण होत आहेत म्हणून नुकसान झालेल्या क्षेत्रावरचे तात्काळ महसूल व कृषी विभागाच्यावतीने पंचनामे करून संबंधित विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या लेखी तक्रारी घेण्याच्या सूचना द्याव्यात तसेच विमा कंपनीने ऑनलाइन पद्धतीनेच तक्रार घेण्याचा नियम घातल्याने शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने तक्रार दाखल करणे शक्य नसल्याने तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची लेखी तक्रार विमा पावतीसह घेण्याची सुविधा तात्काळ सुरु करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल उलट तालुका कृषी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर,माजी सैनीक बालाजी शिंदे तालुका अध्यक्ष बाळासाहेब काजळे,अभिजीत देशमुख,,भगवान रोकडे,पिंटू डोंबे,सोपान धापसे,विजय पाटील,संजय काळे, सुनील गाडेकर, बापू भांबळे,उदय बांगर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत