Breaking News

जिंतूर सेलू मतदारसंघात दहा शिक्षकांना “आमदार उपक्रमशील शिक्षक सन्मान” जाहीर

आमदार मेघनादीदी बोर्डीकरांचा स्तुत्य उपक्रम

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी 

प्रदीप कोकडवार

परभणी :- जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात उपक्रमशील शिक्षकांना आमदार मेघना बोर्डीकरांनी उपक्रमशील शिक्षक सन्मान 2020 जाहीर करून मतदारसंघातील शिक्षकांना सन्मानित करण्याचा महत्वपुर्ण उपक्रम सुरू केला आहे या सन्माना बद्दल शिक्षण क्षेत्रात उपक्रमशील शिक्षक वाढ होत असून हा पुरस्कार मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे उद्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून या सन्मानास पात्र ठरलेल्या शिक्षकाची नावे स्वतः दीदींनी जाहीर केले आहेत ते पुढील प्रमाणे
आमदार_उपक्रमशील_शिक्षक_सन्मान_२०२० खालील प्रमाणे जाहीर
सेलू
१. श्री रामराव भीमराव गायकवाड जि.प.प्रा.शाळा कुंडी
२. श्रीमती शैला बाबूराव जोशी जि.प.प्रा शाळा खूपसा
३. श्री षडानन शंकरराव देशमाने
जि.प.प्रा.शाळा वालूर
४. श्री शिवशंकर चवनअप्पा औसेकर
जि.प.प्रा शाळा हादगाव पावडे
५. श्री माधव लिंबाजी गव्हाणे
सहशिक्षक जि.प.प्रा शाळा रायपूर
जिंतूर
१. श्री अनिल स्वामी,
जिल्हा परिषद कन्या शाळा, चारठाणा

२. श्री पंडित दाभाडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडाळी

३. श्री विनोद मुखेडकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कडसावंगी

४. श्री पुंडलिक कौशल्य,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनवतखेडा

५. श्रीमती शितल मापारी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साखरतळा
जिंतूर सेलु तालुक्यात खूप चांगल्या पद्धतीने शिक्षक आपले अध्यापनाचे कार्य करत आहे. ‘शिक्षक दिन’ जवळ येत आहे. माझ्या मतदारसंघात तन-मन-धनाने, मनोभावे सर्व शिक्षक आपलं कर्तव्य बजावतात. त्यामध्ये काही प्रातिनिधिक शिक्षक मित्रांचा सन्मान करणे हे मी माझे कर्तव्य समजते. दरवर्षी या पद्धतीचे सन्मान देण्याचा आमचा मनोदय आहे. हे या सन्मानाचे पहिले वर्ष, असा सन्मान सर्व शिक्षकांना मिळावा यासाठी ते प्रयत्नशील राहतील. शिक्षण विभागाने अत्यंत गोपनीय पद्धतीने, ही नावं मला सुचविली. जेणेकरून या गुणी शिक्षकांचा गौरव करण्याची संधी मला संपूर्ण #जिंतूर_सेलु तालुक्यातील जनतेच्या वतीने मिळणार आहे, पुनश्च एकदा सर्वांचे अभिनंदन करून शिक्षण मित्र आमदारांनी जनसमर्थक ला बोलताना वरील मनोगत व्यक्त केले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close