Breaking News

म.फुले विद्यालयात शिक्षकदिन साजरा.

संपादक :- अकबर सिद्दीकी

वस्सा  :-    जिंतूर तालूक्यातील वस्सा येथिल म.फुले विद्यालयात दि. 5 सप्टेंबर रोजी शनिवारी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षकदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मच्छिंद्र लुटे हे होते. या प्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त भास्कर दराडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रा. राम कटारे, विलास कोल्हाळ, मीरा जारे, वसंत देशमुख, उमेश सावळकर, तुकाराम कांबळे, महेंद्रकुमार तपोवनकर, कृष्णा राऊत आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण बकरे यांनी केले तर तान्हाजी काळे यांनी आभार मानले. रामेश्वर दाभाडे, रमेश क्षीरसागर, भारत लिंबाळकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता परिश्रम घेतले. फिजीकल डिस्टसिंगचे पालन करुन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close