Breaking News

◆4.50 लाख रुपयांची लाच घेतांना स्वाती सूर्यवंशीसह तिघांना रंगे हात पकडले …

◆ लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई जिल्ह्या भरात खडबड

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

            संपादक :- अकबर सिद्दीकी

       जनसमर्थक :-परभणी येथील निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, अभियंता हमीक अब्दूल खय्युम तसेच अव्वल कारकुन श्रीकांत करभाजने या तिघांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या पथकाने साडेचार लाख रुपयांची लाच घेतल्याबद्दल दिनांक 8 सप्टेंबर मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले.
गंगाखेड येथील नगर पालिकेअंतर्गत विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत नगर परिषद विभागाने संबंधित नगरसेवकाच्या वतीने साडेचारलाख रुपयांची लाच मागीतली. तेव्हा संबंधितांनी तत्काळ लाचलूचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली. या खात्याच्या पथकाने सोमवारी 7 सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली तेंव्हा नगर पालिका प्रशासन विभागातील अव्वल कारकुन श्रीकांत विलासराम करभाजने, अभियंता अब्दूल हकीम अब्दूल खय्युम यांनी तक्रारकर्त्याकडून दीड टक्केप्रमाणे म्हणजे अंदाजे साडेचार लाख रुपये पंचासमक्ष मागणी केली. त्यास निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती वसंतराव सूर्यवंशी यांनी पंचासमक्ष संमती दर्शवली. त्याआधारे या खात्याच्या पथकाने  मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचला. अव्वलकारकुन श्रीकांत करभाजन यांनी तक्रारकर्त्यास अब्दूल हकीम अब्दूल खय्युम यांना पैसे द्यावेत, असे नमुद केले. संबंधितांकडून पंचासमक्ष खय्युम यांनी ती लाच स्वीकारली. पाठोपाठ या पथकाने त्या दोघांना रकमेसह ताब्यात घेतले. आणि तिन्हीही आरोपीस स्वीकारलेल्या रकमेसह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.
या कारवाईत या विभागाच्या पोलिस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे, पोलिस निरीक्षक अतुल कडू, जमीलोद्दीन जागीरदार, शेख शकील, अनिल कटारे, माणिक चट्टे, अनिरूध्द कुलकर्णी, सचिन धबडगे, शेख मुखीद, सारिका टेहरे, मुक्तार, जनार्धन कदम, रमेश चौधरी यांनी ही कारवाई यशस्वी केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close