Breaking News
जिंतूर पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचार्याचा उपचारादरम्यान मृत्यू….

[responsivevoice_button voice="Hindi Female"]
संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर, :- जिंतूर येथील कोरोनाबाधित पोलिस कर्मचार्याचा औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी मृत्यू झाला असल्याची बातमी मिळताच जिंतूर पोलीस ठाण्यात शोककुळा पसरली आहे
जिंतूर पोलिस ठाण्यातील काही दिवसांपूर्वी एक पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आढळले होते. त्यांच्यावर जिंतूर येथे उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला.या घटनेने पोलिस खात्यात शोक व्यक्त केला जात आहे.